सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उच्चांक! आज नव्याने 610 कोरोनाबाधित 

संतोष सिरसट 
Thursday, 10 September 2020

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्याने 610 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक झाला आहे. आज चार 37 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन हजार 427 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 610 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज एकाच दिवशी पुन्हा एकदा 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 452 एवढी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 15 हजार 547 एवढी झाली आहे. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्याने 610 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक झाला आहे. आज चार 37 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन हजार 427 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 610 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज एकाच दिवशी पुन्हा एकदा 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 452 एवढी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 15 हजार 547 एवढी झाली आहे. 

आज समर्थ नगर मोहोळ येथील 78 वर्षाचे पुरुष साडे (ता. करमाळा) येथील 70 वर्षाचे पुरुष, पोस्ट ऑफिस हेड क्वॉर्टर पंढरपूर येथील 60 वर्षाचे पुरुष केम (ता. करमाळा) येथील 65 वर्षांचे पुरुष, किणीवाडी (ता. अक्कलकोट) येथील 60 वर्षाचे पुरुष, नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील 64 वर्षांचे पुरुष, कारुंडे (ता. माळशिरस) येथील 50 वर्षाची महिला, बोरगाव (ता. माळशिरस) येथील 78 वर्षाचे पुरुष, दत्तनगर बार्शी येथील 70 वर्षाचे पुरुष, बावी (ता. बार्शी) येथील 56 वर्षांचे पुरुष, कौठाळी (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षाची महिला, अकलूज (ता. माळशिरस) येथील 62 वर्षाची महिला तर परांडा रोड बार्शी येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावात आढळले नव्याने कोरोनाबाधित 
अक्कलकोट तालुक्‍यातील मैंदर्गी, मंगरूळ, निमगाव, विद्यानगर, वागदरी, करमाळ्यातील भिलारवाडी, घोलप नगर, गुजर गल्ली, गुळसडी, जातेगाव, जेऊर, कानड गल्ली, खडकपुरा, खडकी, किल्ला वेस, किल्ला विभाग, कोंढेज, कोर्टी, कृष्णाजी नगर, कुगाव, कुंभारगाव, कुंभेज, निंभोरे, पांडे, पोथरे, पर्णकुटी, रंभापुरा, साडे, सारंगकर हॉस्पिटल, सरपडोह, साठेनगर, शेळगाव, सिद्धार्थनगर, सुमंत नगर, उमरड, वीट, वाशिंबे, माढा तालुक्‍यातील अरण, बैरागवाडी, बारलोणी, धानोरे, गवळी वस्ती, कुर्डू, कुर्डूवाडी, माळी गल्ली, मोडनिंब, रांझणी, रोपळे क, साई कॉलनी, संमती नगर, शिवाजी नगर, सिद्धार्थ नगर, टेंभुर्णी, वेताळवाडी, विठ्ठलवाडी, यशवंनगर, माळशिरस तालुक्‍यातील 61 फाटा पोळ वस्ती, अकलूज, आनंदनगर, बचेर्ली, भांबुर्डी, बिजवडी, बोरगाव, दसूर, देशमुख वाडी, डोंबळवाडी, गणेश नगर, गणेश गाव, गुरसाळे, जाधव वाडी, कुंधळे बिल्डिंग, लवंग, लोणंद, महाळूंग, माळेवाडी, माळीनगर, माळखांबी, मांडकी, मांडवे, मिरे, मोराची, मोटेवाडी, नातेपुते, नेवरे, पिलीव रोड, पिलीव, राजसिंह नगर अकलूज, रेडे वस्ती, सदाशिव नगर, संग्राम नगर, सपकाळ क्‍लीनिक, श्रीपूर, विजयवाडी, वाघोली, यशवंनगर, मंगळवेढ्यातील भोसे, बोराळे वेस, चेळेकर गल्ली, चोखामेळा नगर, दामाजी नगर, दत्तू गल्ली, पाटेवाडी, गोणेवाडी, हजारे गल्ली, जुनोनी, कचरेवाडी, काझी गल्ली, खंडोबा गल्ली, किल्ला भाग, कुंभार गल्ली, मित्र नगर, नागणेवाडी, निदान सोनोग्राफी सेंटर, रामकृष्ण नगर, साठे नगर, तिसंगी, मोहोळ मधील काकडे वस्ती, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाकणी, तळे हिप्परगा, पंढरपुरातील अकबर गल्ली, अनिल नगर, बाबुळगाव, भक्तिमार्ग, भाळवणी, भोसे, दर्शन मंडप, दत्तनगर, देवडे, एकतानगर, फुलचिंचोली, गाडेगाव, गोकुळ नगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, गुरसाळे, इसबावी, जुनी पेठ, के. बी. पी. कॉलेज चौक, कडवे गल्ली, कालिका देवी चौक, कासेगाव, किश्‍ते गल्ली, कोर्टी, लक्ष्मी नगर, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, नंदुरे, बायपास रोड, नेपतगाव, उमा कॉलेज समोर, पत्रकार नगर, संभाजी चौक, संतपेठ, सरकोली, शंकरगाव, शेगाव दुमाला, सिंहगड कॉलेज कोर्टी, स्टेशन रोड, ठाकरे चौक, उजनी कॉलनी, विठ्ठल नगर, वाखरी, झेंडे गल्ली सांगोल्यातील आयोध्या नगरी, भिमनगर, बिले वस्ती, एकतपूर, जवळा, जुजारपूर, जुनोनी, कडलास, महूद रोड, महूद, मिरज रोडे, नाझरे, पुजारवाडी, शिवाजी चौक, शिवाजीनगर, तिप्पेहळ्ळी, वासुद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मनगोळी, तिल्लेहाळ, विडी घरकूल, बार्शीतील आगळगाव रोड, अलीपूर रोड, आझाद चौक, बालाजी कॉलनी, बारंगुळे प्लॉट, बावी, भातंबरे, भवानी पेठ, भोयरे, काटे गल्ली, दत्तनगर, देशमुख प्लॉट, देवगाव, ढगे मळा, धामणगाव, धस पिंपळगाव, एकता कॉलनी, फाफळवाडी, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, गाडेगाव, गाताचीवाडी, गौडगाव, गवळी गल्ली, घाणेगाव, घोडे गल्ली, गोडसे गल्ली, गोंडील प्लॉट, गुळपोळी, हळद गल्ली, हांडे गल्ली, हातीद, इंदापूर, जुनी चाटे गल्ली, कारी, कासारवाडी रोड, खानापूर रोड, खांडवी, क्रांतिसिंह नगर, लहुजी चौक, लोखंड गल्ली, महागाव, मालवंडी, मानेगाव, मनगिरे मळा, म्हाडा कॉलनी, नागणे प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, काटे गल्ली, जुना रेल्वे स्टेशन, पांगरी, पंकज नगर, पाटील प्लॉट, राऊळ गल्ली, रुई, सहयोग नगर, साई नगर लातूर रोड, सासुरे, शेळगाव, शिवाजी नगर, शिवशक्ती मैदान, सोलापूर रोड, सुभाषनगर, सुर्डी, स्वराज कॉलनी, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग, व्हनकळस प्लॉट, वाणी प्लॉट, यशवंनगर, यावली याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona peaks in rural areas of Solapur district! Today 610 newly coronated