बोरामणी, पाकणी, चिखली, अकलूजमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-27, बार्शी-24, करमाळा-0, माढा-7, माळशिरस-4, मंगळवेढा-0, मोहोळ-6, उत्तर सोलापूर-12, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-70, एकूण-161. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आज एकूण 12 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच पाकणी (ता. उत्तर सोलापूर), चिखळी (ता. मोहोळ) याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढले आहेत. त्याचबरोबर अकलूज व बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथेही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या 161 इतकी झाली आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 162 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 150 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 12 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही 106 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज 12 जण कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये आठ पुरुष व चार स्त्रियांचा समावेश आहे. 
बोरामणी, पाकणी, चिखली, अकलूज येथे प्रत्येकी एक पुरुष, नवीन विडी घरकूल येथे एक स्त्री, वायकुळे प्लॉट बार्शी येथे एक पुरुष व एक स्त्री, मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे एक पुरुष, उल्हासनगर अक्कलकोट येथे एक पुरुष दोन स्त्रिया तर करजगी (ता. अक्कलकोट) येथे एक पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. आतापर्यंत 69 जण बरे होऊन घरी गेले आहेत. अद्यापही रुग्णालयात 81 जणांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागात 11 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patients in Boramani, Pakani, Chikhali, Akluj