शहरातील टेस्टिंग झाले कमी ! आज 198 जणांचीच टेस्ट; 15 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू 

तात्या लांडगे 
Monday, 16 November 2020

ठळक बाबी... 
- एक लाख नऊ हजार 458 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
- आतपर्यंत नऊ हजार 956 जणांचे रिपीर्ट पॉझिटिव्ह 
- 198 संशयितांमध्ये 15 जण बाधित; गळफास घेतलेल्या 25 वर्षीय तरुणासह 75 वर्षीय महिलेचा मृत्यू 
- आतापर्यंत आठ हजार 952 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

सोलापूर : सणासुदीनिमित्त सोलापूर शहरामधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. शहरातील विविध प्रभागांमधील लोक खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर संशयितांची टेस्ट वाढवण्याची गरज असतानाही महापालिकेने टेस्टची संख्या खूपच कमी केली आहे. आज शहरात 198 संशयितांचीच टेस्ट झाली असून त्यात 15 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

शहरात आज माणिक चौक, बेगम पेठ, विकास नगर, शगून रेसिडेन्सी (होटगी रोड), सिद्धेश्वर पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ, यशवंत नगर, जानकी नगर (जुळे सोलापूर), विजयालक्ष्मी आर्केड (रेल्वे लाइन), अशोक नगर (विजयपूर रोड), मुरारजी पेठ, कल्याण नगर (आसरा), सागर चौक (विडी घरकुल) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

शहरात आतापर्यंत 554 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात सध्या ऍक्‍टिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 103 संशयित होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 41 संशयित इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे 26 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing in Solapur city was reduced