सोलापुरात कोरोनाने आज घेतला तिघांचा बळी; 43 रुग्ण वाढले, एकूण बाधित 667

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

सोलापूर शहरातील तीन जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. आज दिवसभरात कोरोनाचे नवीन 43 रुग्ण आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 667 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : सोलापूर शहरातील तीन जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. आज दिवसभरात कोरोनाचे नवीन 43 रुग्ण आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 667 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
दक्षिण सदर बझार परिसरातील 60 वर्षीय महिला 18 मे रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 27 मे रोजी पहाटे एक वाजता या महिलेचे निधन झाले आहे. भवानी पेठेतील मराठा वस्ती येथील 75 वर्षीय पुरुषाला 26 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 26 मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. जुना विडी घरकुल परिसरातील महेश नगर येथील 64 वर्षीय पुरुषाला 25 मे रोजी दुपारी सव्वातीन च्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 27 मे रोजी पहाटे दोन वाजता त्यांचे निधन झाले. आज नव्याने आढळलेल्या 43 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. अशोक चौकातील एक पुरुष व तीन महिला,  दत्तनगर पाछा पेठेतील एक पुरुष व तीन महिला, मिलिंद नगर बुधवार पेठेतील तीन पुरुष, प्रियदर्शनी सोसायटीमधील एक महिला, उत्तर कसबा येथील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एक पुरुष, सोलापूर जिल्हा कारागृह सोलापूर येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील एक पुरुष, अवंती नगर येथील एक पुरुष, कविता नगर पोलिस लाईन येथील एक पुरुष, नइ जिंदगी येथील एक महिला, जुना विडी घरकुल येथील एक पुरुष व तीन महिला, विडी घरकुल येथील चार पुरुष, भवानी पेठ मराठा वस्ती येथील एक पुरुष, पाछा पेठेतील एक पुरुष, माधव नगर येथील एक पुरुष, गीता नगर न्यू पाछा  पेठ येथील एक महिला,  शिव पार्वती नगर येथील एक पुरुष, न्यू बुधवार पेठेतील एक महिला, कुमार स्वामी नगर शेळगी येथील एक महिला, माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील दोन महिला, उपरी (ता. पंढरपूर) येथील एक महिला, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील एक महिला, पंढरपूर तालुक्यातील ज्ञानेश्वर नगर येथील एक पुरुष व एक महिला,  पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एक पुरुष,  अक्कलकोटमधील मधला मारुती येथील एक पुरुष, अक्कलकोटच्या भारत गल्ली येथील एक पुरुष अशा 43 जणांचा समावेश आहे. कोरोना मुक्त झालेल्या 32 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 538 अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona took three dead in Solapur today