दाराशा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात 

प्रमोद बोडके
Saturday, 16 January 2021

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी, गटनेते आनंद चंदनशिवे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते, चंद्रकांत तांबे, डॉ. मंजिरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
सोलापूरः महानगरपालिकेच्या वतीने कोविड19 लसीकरणाचे उदघाटन आज दाराशा हॉस्पिटल येथे राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी, गटनेते आनंद चंदनशिवे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते, चंद्रकांत तांबे, डॉ. मंजिरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 
ही लस पहिल्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन वर्कस व हेल्थकेअर वर्कर यांना दिली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यातील पहिल्या सत्रामध्ये सोलापूर शहरात तीन ठिकाणी लसीकरणाचे नियोजन केले गेले आहे. महानगरपालिकेच्या दाराशा नागरिक आरोग्य केंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी शंभर प्रमाणे एकूण 300 जणांना ही लस दिली जाणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccination begins at Darasha Hospital