सांगोला तालुक्‍यात कोरोना बाधितांची द्विशतकाकडे वाटचाल 

corona.jpg
corona.jpg

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात आज नवीन 32 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्‍यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 198 झाली आहे. तसेच 23 जणांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. तालुक्‍यातील कोरोना बाधितांचे द्विशतकाकडे वाटचाल झाली आहे. 

तालुक्‍यात आज 267 रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 23 जणांचे पॉझिटिव्ह तर 244 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या टेस्टमध्ये अकोला एक, घेरडी 12, जवळा 5, महूद दोन, कडलास एक, बामणी एक व सांगोला शहरातील एकाचा समावेश आहे. 

सोलापूर येथे पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये नऊ जण पॉझिटिव्ह आले आहेत. हे पॉझिटिव्ह रुग्ण सर्व महूद येथील आहेत. आज तालुक्‍यात 90 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. तालुक्‍यात स्वॅब व रॅपिड टेस्टद्वारे 32 जण पॉझिटिव्ह आले असून तालुक्‍यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 198 झाली आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 80 जणांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले असून 111 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com