सर्जा-राजाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांची साहित्य खरेदीची लगबग 

मोहन काळे 
Sunday, 9 August 2020

बैल पोळा साहित्याची दुकाने सजली असून शेतकरी मोठ्या उत्साहाने बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करतानाचे चित्र दिसले. कोरोनाच्या संकटात शेतकरी मात्र सर्जा -राजाला सजवण्याची हौस पुरी करण्यासाठी खरेदी करत आहेत. 

रोपळे बुद्रूक(सोलापूर):रोपळे (ता.पंढरपूर) येथे बाजारात बैल पोळ्यासाठी बैलजोडीला सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याच्या आनंदात शेतकरी बैलपोळ्याचे साहित्य खरेदीचा उत्साह अधिक आहे. 

हेही वाचाः कॉंग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये फिरलेले जयवंतराव जगताप आता राष्ट्रवादीच्या प्रेमात ! 

बैल पोळा साहित्याची दुकाने सजली असून शेतकरी मोठ्या उत्साहाने बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करतानाचे चित्र दिसले. कोरोनाच्या संकटात शेतकरी मात्र सर्जा -राजाला सजवण्याची हौस पुरी करण्यासाठी खरेदी करत आहेत. 

हेही वाचाः डाळिंबाचे दर कोसळले मागील वर्षीच्या तुलनेत भाव निम्म्यावर, तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव 

दावणीला बैलजोडी नसेल तर शेतकरी म्हणून घेणे येथील काही शेतकऱ्यांना पसंत नाही . त्यामुळे या गावात आजही बैलजोडीचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला जातो. दरवर्षी इथे बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीतून मोठी आर्थीक उलाढाल होते. यंदा मात्र जिल्ह्यात पहिल्यापासूनच चांगला पाऊस पडला. त्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेह्यावर दिसत होता. तब्बल दहा वर्षानंतर यंदा प्रथमच वेळेत व चांगले पाऊस पडत गेले. कोरोनामुळे तोंडाला रुमाल अथवा मास्क लावून बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करतानाचे चित्र दिसून आले . 

यंदा चांगल्या पावसाचा आनंद 
कोरोनाचं संकट असल तरी यंदा चांगला पाऊस पडलाय. मग पोळ्याला बैलजोडीची हौस करायला आम्ही मागं-पुढं बघणार नाहीत. 
- कैलास व्यवहारे शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता . पंढरपूर 

शेतकऱ्यांची खरेदी सूरू 
यंदा आम्ही बैल पोळ्याच्या साहित्याचे पहिल्यांदाच दुकान लावले आहे. आजूबाजूच्या गावातूनही शेतकरी इथे बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येऊ लागले आहेत . 
- निहाल शेख, बैल पोळा साहित्य विक्रेते, रोपळे बुद्रूक, ता . पंढरपूर 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers used to buy materials to decorate Sarja-Raja