esakal | #Coronavirus : तो पुण्याहून आला चालत अन्‌ मग...
sakal

बोलून बातमी शोधा

#Coronavirus : तो पुण्याहून आला चालत अन्‌ मग...

पुण्यात टेलरींग काम करणाऱ्या तरुणाची खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याने तो चालत घराकडे आला आहे. त्याला वैद्यकीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. आपल्या घराच्या परिसरात जर कोणी बाहेरून येत असेल तर तत्काळ 0217-2744600 या क्रमांकावर माहिती द्यावी. 
- बजरंग साळुखे, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक

#Coronavirus : तो पुण्याहून आला चालत अन्‌ मग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यात टेलरिंग काम करणारा एक तरुण सोमवारी चालत सोलापुरात घरी आला. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला वैद्यकीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

लॉकडाउनच्या काळात करा  अर्थार्जनाचे परफेक्‍ट नियोजन 

कोरोनामुळे संचारबंदी असल्याने गांधी नगर परिसरात सोमवारी दुपारी तरुण पुण्याहून चालत आला. सायंकाळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे आणि त्यांचे पथक गांधी नगरात दाखल झाले. संशयित तरुणास ताब्यात घेण्यात आले. रुग्णवाहिका बोलावून त्याला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस आल्याचे कळताच परिसरातील नागरिकही घराबाहेर आले. पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावले. 

go to top