टोमॅटो लागवड खर्च लाखात मात्र भाव फक्त दोन रुपये किलो 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 13 January 2021

जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांना टोमॅटोंचे भाव पुन्हा एकदा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. येथील मार्केट यार्डामध्ये टोमॅटोचे भाव अक्षरशः तीन रुपये किलो एवढे निचांकी पोहोचले आहेत. टोमॅटो उत्पादकांना वर्षभरात त्यांच्या टोमॅटो उत्पादन व विक्रीच्या व्यवहारात अतिवृष्टी, विषाणूजन्य आजार व आता बाजारभावाचे असे तिहेरी नुकसान झाले आहे. 

सोलापूरः टोमॅटो उत्पादकांना एका कॅरेट साठी पंधरा रुपये खर्च निव्वळ वाहतुकीचा येत असताना भाव मात्र दोन ते तीन रुपये किलो मिळु लागले आहे. लागवड खर्च नुकसानीत गेला असून वाहतुकीला देखील टोमॅटोचे भाव परवडेनासे झाले आहेत. 

हेही वाचाः कोरोनावरील लस आज येणार ! जनजागृतीसाठी घेतली जाणार शिक्षकांची मदत 

जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांना टोमॅटोंचे भाव पुन्हा एकदा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. येथील मार्केट यार्डामध्ये टोमॅटोचे भाव अक्षरशः तीन रुपये किलो एवढे निचांकी पोहोचले आहेत. टोमॅटो उत्पादकांना वर्षभरात त्यांच्या टोमॅटो उत्पादन व विक्रीच्या व्यवहारात अतिवृष्टी, विषाणूजन्य आजार व आता बाजारभावाचे असे तिहेरी नुकसान झाले आहे. 
या वर्षी सुरुवातीला अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात इतर पिकांच्या समवेत भाजीपाल्याच्या लागवडीचे मोठे नुकसान झाले होत. त्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्याने पुन्हा या उत्पादकांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. मात्र त्यावर विषाणूजन्य आजाराचा प्रार्दूभाव झाला. त्या कालावधीत झालेल्या सर्व लागवडीला या प्रार्दुभावाचा फटका बसला. तेव्हा देखील टोमॅटोला काळे डाग पडल्याने त्याचे भाव पडलेले होते. नंतरच्या टप्प्यात उत्पादकांनी नव्याने टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. हा माल बाजारात आल्यानंतर आवक जास्त झाली. स्थानिक बाजारात आवक जास्त व ग्राहकांची मागणी कमी अशी विसंगती झाल्याने पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. मार्केटयार्डामध्ये तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल असे भाव दिले जात आहेत. तर किरकोळ बाजारात दहा रुपये किलो किंवा दिड किलो असे भाव मिळत आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा टोमॅटो उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

टोमॅटोचा अंदाजीत एकरी उत्पादन खर्च 
रोपे ः दहा हजार रुपये 
लागवड मजूरी ः चार हजार रुपये 
खत व औषधे ः चाळीस हजार रुपये 
काढणी मजूरी ः दहा हजार रुपये 
एकूण खर्च ः 64 हजार रुपये 
एकरी उत्पादन ः अंदाजे पाच टन 
मिळालेला भाव ः तीन ते चार रुपये प्रती किलो 
प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न ः पंधरा हजार रुपये 
झालेले नुकसान ः 49 हजार रुपये 

लागवड तोट्यात 
मी यावेळी तीन एकर मध्ये टोमॅटोचा प्लॉट घेतला. पण बाजारात टोमॅटोला दोन ते तीन रुपये किलो भाव मिळू लागला आहे. आतापर्यंत माझा लागवड खर्च तीन लाख रुपये झाला आहे. टोमॅटोची लागवड तोट्यात गेली आहे. 
- अमोल गरड, टोमॅटो उत्पादक शेतकरी कासेगाव, द.सोलापूर  

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cost of planting tomatoes in lakhs, however, is only Rs 2 per kg