पंचवटी पतसंस्थेतर्फे कोविड योध्यांचा सन्मान 

प्रमोद बोडके
Wednesday, 8 July 2020

नवी पायवाट निर्माण करून दिली

कर्मचाऱ्यांच्या मनात कर्तव्य भावनेबरोबरच समाजासाठी सेवाभाव जागृत ठेवण्याचे काम पंचवटी परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. पतसंस्थेचे दैनंदिन व्यवहाराची कामे करीत असतानाच गरजूंना मदतीचा हात दिला आहे. हा सेवाभाव जागृत करून त्यांनी सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नवी पायवाट निर्माण करून दिली असल्याचे मत चंद्रकांत धोंडे-पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूर : पतसंस्थांचे काम अर्थकारणाशी निगडित असले तरी मानवतेची जपणूक करत सोलापुरातील पंचवटी नागरी सहकारी पतसंस्थेच्याच्यावतीने जागतिक सहकार दिनानिमित्त कोविड योध्दांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सहकार भारतीचे सोलापूर जिल्हा संघटक चंद्रकांत धोंडे-पाटील हे होते. 

यावेळी सहकार भारतीचे जिल्हा संघटक चंद्रकांत धोंडे-पाटील यांच्या हस्ते माणिक पतंगे, दिनेश म्हंता आणि अक्षय पतंगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन नागेश रणसुभे हे होते. तर श्री. विष्णू सातवेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख तसेच सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, फेडरेशनचे संचालक रंगनाथ गुरव, फेडरेशनच्या व्यवस्थापिका सौ. मीनाक्षी केंची, प्रकाश चिलवेरी, नितीन एकबोटे, अनिल कन्ना, प्राजक्ता रंगदळ, नीलेश गुरव, राहुल विश्वनाथ, ओंकार पतंगे, तसेच पंचवटी पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक नागेश रणसुभे यांनी केले. आभार नितीन एकबोटे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid warriors honored by Panchavati Patsanstha