esakal | दुचाकीवरून दोघांनी पळवून नेली शेळी ! लग्नात मोबाईल दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

बोलून बातमी शोधा

Solapur_Crime News}

परिसरातील घरासमोर चरण्यासाठी सोडलेली शेळी चरत-चरत घरामागे गेली. काही वेळाने शेळी पाहण्यासाठी उमेश लाह्याप्पा उबाळे (रा. विद्या नगर, शेळगी) हे घराबाहेर आले. मात्र, त्यांना शेळी दिसलीच नाही. त्यांनी आसपास शोध घेतल्यानंतर त्यांना शेजारील व्यक्‍तींनी सांगितले की, दोन व्यक्‍ती दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी शेळी उचलून नेली आहे. 

solapur
दुचाकीवरून दोघांनी पळवून नेली शेळी ! लग्नात मोबाईल दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : विद्या नगर (शेळगी) परिसरातील घरासमोर चरण्यासाठी सोडलेली शेळी चरत-चरत घरामागे गेली. काही वेळाने शेळी पाहण्यासाठी उमेश लाह्याप्पा उबाळे (रा. विद्या नगर, शेळगी) हे घराबाहेर आले. मात्र, त्यांना शेळी दिसलीच नाही. त्यांनी आसपास शोध घेतल्यानंतर त्यांना शेजारील व्यक्‍तींनी सांगितले की, दोन व्यक्‍ती दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी शेळी उचलून नेली आहे. त्यानंतर उबाळे यांनी जोडभावी पोलिसांत धाव घेतली आणि शेळी चोरी झाल्याची फिर्याद दिली. पोलिस नाईक श्री. जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

विवाहितेचा सासरच्यांकडून छळ 
गुरुनानक नगर परिसरातील स्नेहा ऊर्फ विहाना जितू लखवानी यांचा विवाह अहमदाबाद येथील जितू विष्णूभाई लखवानी याच्याशी 29 जून 2018 मध्ये झाला. मात्र, विवाहात तुझ्या माहेरच्यांनी मानपान व्यवस्थित केला नाही, मोबाईल दिला नाही, अन्य वस्तूही कमीच दिल्या म्हणून लखवानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद स्नेहा यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यानुसार पती जितू लखवानी, सासू माला लखवानी, सासरा विष्णूभाई लखवानी, दीर नितेश लखवानी, नणंद भारती यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. काळे हे करीत आहेत. 

लिपिक भाच्याची आत्महत्या; मामा, मामीसह चौघांना अटकपूर्व जामीन 
चतुराबाई श्राविका विद्यालयात (होटगी रोड) लिपिक म्हणून कार्यरत गुंडेराव बोदांर्डे (रा. पापारामनगर) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भालचंद्र जगन्नाथ कस्तुरकर, इंदुमती भालचंद्र कस्तुरकर, रूपाली शशिकांत शेंडगे, रमेश दिगंबर चौधरी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. मोहिते यांनी आज अटकपूर्व जामीन मंजूर केला. तत्पूर्वी, ऍड. धंजनय माने, ऍड. जयदीप माने यांच्या वतीने तत्कालीन मुख्याध्यापक नंदकुमार सावळे यांनी अर्ज केला होता. त्यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. 

मृत गुंडेराव बोदांर्डे हे चतुराबाई श्राविका विद्यालयात लिपिक म्हणून काम करण्यापूर्वी, ते नूतन प्रशालेत लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होते. 2001 ते 2003 या कालावधीत पदोन्नती व पगार न दिल्यामुळे संस्थेतील कार्यरत सदस्यांच्या त्रासास कंटाळून त्यांनी 20 जानेवारी 2021 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मृताची पत्नी रेखा बोदांर्डे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून ऍड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्‍यावर संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात संशयित आरोपींतर्फे ऍड. थोबडे, ऍड. सतीश शेटे यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे ऍड. नाना कदम, ऍड. मंजुनाथ कक्‍कळमेली यांनी तर सरकारतर्फे ऍड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले. संशयित आरोपी सावळेच्या वतीने ऍड. विकास मोटे, ऍड. सोमनिंग पुजारी यांनीही काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल