esakal | माहेरून तीन लाख रुपये आण, मला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दे म्हणून विवाहितेचा छळ
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News in Solapur

पतीसह तिघांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

माहेरून तीन लाख रुपये आण, मला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दे म्हणून विवाहितेचा छळ

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : घराच्या बांधकामासाठी तीन लाख रुपये घेऊन ये, म्हणून विवाहितेला त्रास देऊन तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पती मनोज नागनाथ नवगिरे, उषा नागनाथ नवगिरे, नागनाथ नामदेव नवगिरे सर्वजण (रा. राहुल नगर, हत्तुरे वस्ती) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्वाती नवगिरे यांनी फिर्याद दिली. विवाहानंतर काही दिवसांनी पती मनोज व उषा यांनी दुसऱ्या लग्नाला परवानगी दे आणि बांधकामासाठी पैसे आण म्हणून त्रास दिला. पती मनोज याने शिवीगाळ व मारहाण करून गळा दाबला आणि ढकलून देऊन जखमी केले, असेही स्वाती यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. केदार हे करीत आहेत.

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द ! ऑनलाइन शिक्षणाचे बंधन; कामचुकारांवर बिनपगारीची कारवाई

लोन देतो म्हणून व्यापाराची फसवणूक

सोलापूर : बिगर व्याजाने चार लाख रुपयांचे लोन देतो म्हणून एका व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरूध्द जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. व्यंकटेश पांडुरंग सामल (रा. युनिक होम आपार्टमेंट, चिप्पा मार्केट) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार संशयित आरोपी आनंद अग्रवाल, प्राची देसाई, मिलिंद महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बजाज फायनान्समधून आनंद अग्रवाल बोलतोय, असे सांगून बिगर व्याजाने कर्ज देतो, तुम्ही वार्षिक हप्ते भरा, पहिला हप्ता भरल्यानंतर लोनची रक्कम खात्यात जमा होईल, असे अमिष दाखविले. दरम्यान, प्राची व मिलिंद या दोघांनी जीएसटी पार्ट पेमेंट करायचे आहे, त्यासाठी रॉयल स्लॉग करायचे आहे, असे सांगून वेळोवेळी अकाऊंट नंबरवरून आठ लाख 35 हजार 700 रुपये बजाज फायनान्स व सर्व्हिसेसच्या खात्यात भरून घेतली. मात्र, अजूनही कर्ज मिळाले नाही, असेही सामल यांनी पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. बादोले हे करीत आहेत.

किरकोळ कारणावरून मारहाण

सोलापूर : तुम्ही इथे का थांबता म्हणून शिवीगाळ करून तरुणास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन करजगी, बसवराज करजगीसह अन्य दोघांचा त्यात समावेश आहे. ऋषिकेश महेश देडे (रा. भारतरत्न इंदिरा नगर) याने पोलिसांत फिर्याद दिली. त्या चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली, असेही देडे याने पोलिसांना सांगितले. भांडण सोडवायला आलेल्या मित्राच्या डोक्‍यात बिअरची बाटली फोडून त्यालाही जखमी केले. त्यानंतर बसवराज करजगी याने बांबूच्या लाकडाने दोघांनाही मारहाण केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. नदाफ हे करीत आहेत. तर घरासमोर विनाकारण जोरजोरात गप्पा मारत असल्याच्या कारणावरून चौघांनी मारहाण केली, अशी फिर्याद बसवराज करजगी याने सदर बझार पोलिसांत दिली. त्यानुसार ऋषिकेश देडे, अनिकेत देडे, अक्षय बुर्ला, इम्रान इनामदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार श्री. काळे हे करीत आहेत.