
सोलापूर : मेहुणीच्या साखरपुड्यासाठी परगावावरून पाहुणे सोलापुरात आले होते. उकाड्यामुळे गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवला. घराचा मुख्य दरवाजा बंद करून घरातील सर्वजण झोपी गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून गॅलरीच्या दरवाजामागे अडकविलेल्या पाहुण्यांच्या पॅंन्टीतून 29 हजार रुपयांच्या रोकडसह खिशातील मोबाईल चोरट्याने चोरून नेल्याची घटना सुशिल रसिक सभागृहासमोरील गणेश मच्छिंद्र खुर्द यांच्याकडील भाड्याच्या घरात (मुरारजी पेठ) घडल्याची फिर्याद विक्रम विजयकुमार माने यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली.
दारुच्या नशेत तरुणाने घेतला गळफास
सोलापूर : वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील अंकुश ब्रह्मानंद वाघमारे (वय 32) यांनी दारुच्या नशेत छताला साडीने गळफास घेतला. त्यांना बेशुध्द अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना मंगळवारी (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास सुनिल नगर परिसरात घडल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
सोलापूर : एक लाख रुपये दिल्याशिवाय शेती विकू नको म्हणत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याप्रकरणी चंद्रकांत दऱ्याप्पा राजमाने, सिध्दाराम राजमाने (दोघेही रा. मसरे गल्ली, उत्तर कसबा) आणि विकास धुम्मा (रा. मल्लिकार्जून मंदिराजवळ, बाळीवेस) यांच्याविरुध्द विजापूर नाका पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सतिश मल्लिनाथ राजमाने (रा. न्यू संतोष नगर, विजयपूर रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पैसे दिल्याशिवाय शेतात येऊ देणार नाही, पत्नीला सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवितो, अशी धमकीही दिल्याचे सतिश यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. वाल्मिकी हे करीत आहेत.
बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई
सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 62 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंग अथवा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडूनही पोलिसांनी सहा हजारांचा दंड वसूल केला आहे. शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत दररोज कारवाई केली जात असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.