पैशाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त

Crime News in Solapur District
Crime News in Solapur District
Updated on

सोलापूर : लग्नात मानपान केला नाही, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला. माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी जाच सुरू केल्याची फिर्याद सौ.पूनम विनय वानेटकर (वय 29, रा. वाघोली, पुणे, सध्या रा. विजयकुमार देशमुखनगर, निर्मिती विहारजवळ, विजापूर रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून पती विनय मुकुंदराव वानेटकर, सासू ललिता मुकुंदराव वानेटकर, सासरे मुकुंदराव रामराव वानेटकर, नणंद पल्लवी साहिल चव्हाण, नणंदेचा पती साहिल चव्हाण, लहान नणंद सुचिता मनोज धामणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रवासादरम्यान 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास
 
खासगी ट्रकमधून जळकोट ते सोलापूरदरम्यान प्रवास करताना बोरामणीमधून ट्रकमध्ये बसलेल्या चार अनोळखी इसमांनी पिशवीतील दागिने, रोख रक्कम असा सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या बाबतची फिर्याद नम्रता संतोष पाटसुपे (वय 40, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी जेलरोड पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

उसन्या पैशाची मागणी केल्याने शिवीगाळ
 
दिलेले ऊसने पैसे परत मागितले, म्हणून शिवीगाळ केली. अंगावर धावून आल्याची फिर्याद उमाकांत नागनाथ गोसावी (वय 51, मु. पो. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून अरुण बब्रुवान गुंड (रा. गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गोसावी यांनी तीन टप्प्यात रोखीने 1 लाख 80 हजार रुपये गुंड यांना दिले होते. या पैशाची मागणी केली असता आपल्याला दमदाटी शिवीगाळ केल्याचे गोसावी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

घरातून जात नसल्याने शिवीगाळ
 
जागेचा वाद सुरू असलेल्या घरातून निघून जात नाही, म्हणून अरिफ इक्‍बाल कल्याणी (रा. बेगम पेठ, सोलापूर) यांनी आपल्याला व मुलाला शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. मुलाला रॉड आणि बेल्टने मारहाण केल्याची फिर्याद मोहसिना इम्तियाज कल्याणी (वय 38, रा. बेगम पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून आरिफ कल्याणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साडेदहा लाखांची फसवणूक
 
घर खरेदीसाठी घेतलेले 10 लाख 50 हजार रुपये परत दिले नाहीत व घराचीही खरेदी करून दिली नसल्याने आपली दहा लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद तारक राजाभाऊ कावळे (वय 43, रा. कावळे मेडिकलच्या वरच्या मजल्यावर, बाळीवेस, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून ललित गोवर्धन लोया (रा. सिद्धी रेसिडेन्सी, सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एसटीत चढताना सव्वा लाखाचा ऐवज लंपास
 
सोलापूर बसस्थानकावरून बेगमपूरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एक लाख 7 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अर्चना सचिन पवार (वय 28, रा. बेगमपूर, ता. मोहोळ) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. अर्चना पवार यांच्या जाऊ मुलांसह बेगमपूरकडे निघाल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून त्यांमधील तीन तोळ्याचे गंठण, दोन हजार रुपये रोख असा एक लाख 7 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com