कोरोनाची वाटेना भिती ! सामूहिक नमाज पठणप्रकरणी 87 जणांविरुध्द गुन्हे 

तात्या लांडगे
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

  • सोलापुरात संचारबंदी उल्लंघनाचे चार गुन्हे दाखल 
  • जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास लागला विलंब 
  • फिर्याद कोणी द्यायची यावरुन पेच निर्माण झाल्याची चर्चा 
  • अक्‍कलकोटमध्येही सामुहिक नमाज पठण : पोलिसांकडून सहकार्याचे आवाहन 

सोलापूर : शहरातील जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सामूहिकपणे नमाज पठण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले. पोलिसांच्या फिर्यादीनुसार एकूण 16 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, जोडभावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही सामूहिक नमाज पठणप्रकरणी 60 जणांना पोलिसांनी पकडले. मात्र, गुन्हा दाखल करण्यास विलंब लागला. 

हेही नक्‍की वाचा : अरेच्चा ! सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेसचे ऑनलाइन बुकिंग हाउसफूल्ल 

कोरोना या जीवघेण्या विषाणूला हद्दपार करणे तथा शहरात त्याचा शिरकाव होऊ नये, या हेतूने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 14 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले. तरीही एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. विनायक नगरातील मदिना ए मनोवरा अरबी मदरसा येथे एकत्रित नमाज पठण करणाऱ्या काजल कनौद्दीन आळंद, अन्वर निजामोद्दीन मासुलदार, मुस्ताक अ. हुसेन विजापुरे, लाडलेसाब मौद्दीन शेख, शब्बीर हजरत सय्यद यांच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल अ. रजाक आदम प्यारे यांनी फिर्याद दिली. तर सहायक पोलिस निरीक्षक पैगंबर असमोद्दीन शेख यांच्या फिर्यादीनुसार सुलेमान मेहताब आतार, टिपू सुलतान मुर्तुजअली सौफी, तौफिक कासीम शेख, नन्नासाहेब हुसेनी मंडाले, उस्मान महिबूब शेख, समीर फजल अहमद चौधरी, इलियास गफूर बल्लारी, आरिफ सुलेमान शेख, सैफन बाबूमिया कोळ्ळे, रमीज रसूल पटेल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : अबब...! कारागृहाची क्षमता 141 अन्‌ आहेत 428 कैदी 

अक्‍कलकोटमध्येही 11 जणांविरुद्ध गुन्हे 
संचारबंदी असतानाही अक्‍कलकोटमधील बुधवार पेठेतील मशिदीत सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 11 जणांविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक धनराज निवृत्ती शिंदे यांच्या फिर्यादीनुसार चांद महिबूब दावना, अल्ली अमीर तांबोळी, महिबूब हबीब शेख, शमशोद्दीन महिबूब नदाफ, बशीर चॉंदसाब नदाफ, आदम सुलेमान फुलारी, हबीब कादर शेख, हसद नबीलाल कन्नी, शकील महीबूब शिलेदार, गुलाब सैपन आतार, महमद सैपन मुलुक नाईकवाडी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against 87 people for mass worship