esakal | एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी यांच्यासह सात जणांविरूद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Crimes against seven people including MIM Farooq Shabdi

सर्वोपचार रुग्णालयातून पहिल्या दिवशी तीन रुग्णांना रुग्णवाहिकेतून घरी सोडले जात असताना पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोरोना या विषाणूवर मात केल्याप्रकरणी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. त्या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास दिला. त्यानंतर प्रत्येक वेळी रुग्ण घरी सोडताना डॉक्टरांची उपस्थिती होती.

एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी यांच्यासह सात जणांविरूद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्ण श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून बरे होऊन घरी जात होते. त्यावेळी सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात त्यांच्यावर विनापरवाना पुष्पवृष्टी करणे, त्यांना शीतपेय वाटप करणे आणि यावेळी सोशल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शब्दी याच्यासह अन्य सहा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सर्वोपचार रुग्णालयातून पहिल्या दिवशी तीन रुग्णांना रुग्णवाहिकेतून घरी सोडले जात असताना पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोरोना या विषाणूवर मात केल्याप्रकरणी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. त्या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास दिला. त्यानंतर प्रत्येक वेळी रुग्ण घरी सोडताना डॉक्टरांची उपस्थिती होती. मात्र, विनापरवाना सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नसतानाही शाब्दी हे 1 मे रोजी त्यांच्या सहकार्‍यांसह सर्वोपचार रुग्णालयात गेले. त्यांच्यासोबत रसूल पठाण, विक्रम वाडे, शहाजहाँ चौधरी, रमजान शेख व अन्य दोन सहकारी उपस्थित होते. कोरोनातून बरे झालेले रुग्ण घरी सोडले जात असताना शाब्दीसह अन्य सहकाऱ्यांनी या रुग्णांवर पुष्पवृष्टी केली. त्याच वेळी त्यांना शीतपेयांचे वाटपही केले. संचारबंदीच्या काळात शाब्दी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. 

सोशल डिस्टन्ससह, संचारबंदीचेही उल्लंघन
कोरोना या विषाणूवर मात करीत बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना, त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढावा या हेतूने रुग्णालयाबाहेर त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले जाते. त्यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्यासह स्टाफ उपस्थित असतो. मात्र एक मे रोजी फारूक शाब्दिक यांनी कोणाचीही परवानगी न घेता त्यांच्या सहकार्‍यांसह बरे झालेल्या रुग्णांवर पुष्पवृष्टी करत शीतपेय वाटप केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती सदर बाझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.

go to top