esakal | बळीराजासाठी ! 'ठिबक' अनुदानासाठी 20 फेब्रुवारीची डेडलाईन 
sakal

बोलून बातमी शोधा

micro-irrigation

मुदतीत प्रस्ताव दिल्यास मिळेल अनुदान 
ठिबक अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर एका महिन्यात त्यांनी ठिबक संच बसवणे अनिवार्य आहे. प्रस्ताव तालुकास्तरावर दिल्यानंतर कृषी सहायकांनी संबंधितांचा सातबारा उतारा पडताळणी करुन मोका तपासणी करावी. अनुदानाचा अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असून मुदतीत प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ अनुदान मिळेल. बनावट प्रस्ताव देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- शिरिष जमदाडे, संचालक, फलोत्पादन 

बळीराजासाठी ! 'ठिबक' अनुदानासाठी 20 फेब्रुवारीची डेडलाईन 

sakal_logo
By
तात्या लांडगे

हेही नक्‍की वाचा : सोलापुरात भाजपला बसणार धक्‍का ! खासदार कमी होण्याची भिती 


सोलापूर : यावर्षी ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम देण्यात आली आहे. मार्चएण्डची लगबग सुरु असतानाच बनावट प्रस्ताव दाखल होण्याची शक्‍यता असल्याने मोका तपासणीवेळी कृषी सहायकांनी संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा पडताळणी करुन मालकी तपासावी, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. जानेवारीपासून कृषी विभागाने पूर्व संमती मिळूनही महिन्यात प्रस्ताव न दिलेल्या तब्बल 80 हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक...दिड लाख विद्यार्थ्यांची वाढली चिंता 


राज्यातील सततचा दुष्काळ, जमिनीची खोलवर गेलेली पाणीपातळी यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा कल ठिबक सिंचनकडे वाढू लागला आहे. 2019- 20 मध्ये राज्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करुन अनुदानासाठी अर्ज केले असून त्यापैकी 45 हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. पूर्वसंमती मिळूनही मुदतीत प्रस्ताव न दिलेल्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक अर्ज जानेवारी व फेब्रुवारीत रद्द ठरविण्यात आले आहेत. अनुदानाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदत जाहीर केल्याने महिन्याला 30 ते 32 हजार अर्ज येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, कंपनी, कृषी सहायक तथा कृषी अधिकारी, काही शेतकऱ्यांकडून या कालावधीत बनावट अर्ज येवू शकतात, या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अधिकाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या आहेत. 


हेही नक्‍की वाचा : जात पडताळणी समितीचे निर्देश : मूळ कागदपे द्या अन्यथा... 


ठळक बाबी... 

  • पूर्वसंमतीनंतर महिन्यात प्रस्ताव न दिल्यास अर्ज ठरणार रद्द : जानेवारीपासून नियम लागू 
  • राज्यातून आतापर्यंत ठिबक अनुदानाचे तीन लाख 77 हजार शेतकऱ्यांनी केले अर्ज 
  • 2020-21 च्या अनुदानाची कार्यवाही 25 एप्रिलनंतर 
  • अर्ज रद्द झालेल्यांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना वितरीत : मार्चएण्डची लगबग 
  • सातबारा पडताळून कृषी सहायकांनी करावी मोका तपासणी : कृषी विभागाचे निर्देश 


हेही नक्‍की वाचा : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी 15 पैकी अकरा अर्ज अपात्र 

go to top