esakal | धक्‍कादायक ! परीक्षा नियंत्रकासाठी 15 पैकी अकराजण अपात्र 
sakal

बोलून बातमी शोधा

ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY
  • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांची निवड 
  • नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर येथून आले अर्ज 
  • अपात्र अर्जदारांना हरकती नोंदविण्यासाठी 20 फेब्रुवारीची डेडलाईन 
  • अनुभव नसतानाही उमेदवारांचे अर्ज : विद्यापीठाने काढली त्रुटी 

धक्‍कादायक ! परीक्षा नियंत्रकासाठी 15 पैकी अकराजण अपात्र 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदासाठी राज्यभरातून 15 जणांनी अर्ज केले. मात्र, विद्यापीठाच्या छाननी समितीने त्यापैकी तब्बल 11 अर्ज अपात्र ठरवले असून संबंधितांना पुरेसा अनुभव नसल्याचे कारण पुढे केले. अपात्र ठरविलेल्या उमेदवारांना हरकती नोंदविण्यासाठी 20 फेब्रुवारी अंतिम मुदत देण्यात आली आहे. 


हेही नक्‍की वाचा : जात पडताळणी समितीचा भाजपला धक्‍का ! 


विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या रिक्‍त पदासाठी अर्ज मागविण्यात आले. नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांतून विद्यापीठाला 15 अर्ज प्राप्त झाले. 2 फेब्रुवारीला प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननी समितीने त्यातील 11 जणांना या पदावर काम करण्यासाठी पुरेसा अनुभव नसल्याचे निरीक्षण नोंदवले. दरम्यान, अपात्र उमेदवारांना हरकती नोंदविण्यासाठी 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हरकती प्राप्त न झाल्यास उर्वरित चार उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे परीक्षा नियंत्रकांची निवड केली जाणार आहे. मार्चपर्यंत नवा परीक्षा नियंत्रक निवडला जाणार असल्याने त्या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. 

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक...दिड लाख विद्यार्थ्यांची वाढली चिंता 

पात्र अन्‌ अपात्र ठरलेले उमेदवार 
डॉ. अंबादास भांडू, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. गजानन पाटील, डॉ. शिवकुमार गणापूर या चार जणांचे परीक्षा नियंत्रक पदासाठीचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. तर, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. काशिनाथ मुंडे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. रवींद्र मुळे, डॉ. प्रदीपकुमार दराडे, डॉ. सुहास असगेकर, डॉ. अर्जुन घाटुळे, डॉ. मधुरा जगताप, डॉ. मल्हारी मसलखांब, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. विलास शिंदे या 11 जणांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. 


हेही नक्‍की वाचा : जात पडताळणी समितीचा इशारा...मूळ कागदपत्रे द्या अन्यथा फौजदारी 


छाननीत समितीने केले 11 अर्ज बाद 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी 15 जणांनी अर्ज केले होते. परंतु, त्यापैकी अकराजणांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून त्यांना कामाचा पुरेसा अनुभव नसल्याने ते बाद ठरविले आहेत. संबंधितांना हरकत घेण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
- डॉ. विकास घुटे, कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

go to top