esakal | बळीराजासाठी गूड न्यूज : कर्जमाफीची 28 फेब्रुवारीला दुसरी यादी 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

कर्जमाफीच्या लाभाचे ठोस नियोजन 
राज्यातील 68 गावांमधील 15 हजार 358 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. पोर्टलवर याद्या अपलोड केल्या जात असून सरकारच्या निर्देशानुसार कर्जमाफीचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. आता 28 फेब्रुवारीला कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 
- डॉ. आनंद जोगदंड, अप्पर आयुक्‍त, सहकार 

बळीराजासाठी गूड न्यूज : कर्जमाफीची 28 फेब्रुवारीला दुसरी यादी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महाविकास आघाडीने राज्यातील 34 लाख शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार 15 हजार 358 शेतकऱ्यांची पहिली यादी 24 फेब्रुवारीला प्रसिध्द झाली. आता सुमारे 69 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी 28 फेब्रुवारीला प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, पोर्टलवर याद्या अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने याद्या प्रसिध्दीस विलंब होत आहे. याद्या अपलोड होतील तसा लाभ देण्यात येत असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 


नक्‍की वाचा : अरेच्चा ! खासदार डॉ. महास्वामींनी जातीचे मूळ प्रमाणपत्र दिलेच नाही 


राज्यातील जिल्हा बॅंका आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील 34 लाख शेतकरी दोन लाखांच्या कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यामध्ये 18 लाख शेतकरी जिल्हा बॅंकांमधील आहेत. बॅंकांकडून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांची माहिती सहकार विभागाने संकलित केली असून आता आधार प्रमाणिकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. 35 टक्‍क्‍यांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर काही शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतही त्रुटी असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. आपले सरकार सेवा केंद्रातून त्यात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरु असून संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. राज्यातील केवळ 68 गावांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : राज्यातील 40 हजार शिक्षकांना वाटाण्याच्या अक्षता 


ठळक बाबी... 

  • तिसऱ्या अन्‌ चौथ्या यादी पाच लाखांपर्यंत शेतकऱ्यांचा असणार समावेश 
  • सुमारे 69 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी 28 फेब्रुवारीला होणार प्रसिध्द 
  • कर्जमाफीच्या पोर्टलवर याद्यांचा बोजा : तांत्रिक अडथळ्यांमुळे अपलोडिंगला विलंब 
  • दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या 34 लाख शेतकऱ्यांना तीन महिन्यात लाभ देण्याचे नियोजन 
  • 10 मार्चपर्यंत तिसरी यादी प्रसिध्द करण्याचे सहकार विभागाचे नियोजन 

हेही नक्‍की वाचा : खुषखबर ! पाठदुखीचा त्रास होणार कमी