खुषखबर...पाठदुखीचा त्रास होणार कमी 

तात्या लांडगे
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020


काय आहे 'आसन' प्रकल्प 
आपण बसताना पार्श्‍वभागावरील वजनामुळे प्रेशर पॉईंट्‌स तयार होतात. मांड्यावरील वजनाची प्रेशर पॉईंट्‌सचाही विचार करून लोड सेल असलेले Nano Arduino मायक्रो कंट्रोलर सर्किट असलेल्या आसनाची निर्मिती केली आहे. त्यासाठी संशोधकांनी डिझाईन थिंकींग या तत्वाचा अवलंब केला आहे. या आसन प्रॉडक्‍टच्या वापराने बसण्याच्या योग्य पद्धतीसाठी अलर्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून वापर करणाऱ्या व्यक्तीची बसण्याची पद्धत सुधारेल आणि संभाव्य पाठदुखीपासून बचाव होईल. 

सोलापूर : नाविन्यतेची संस्कृती तयार करणे आणि सामाजिक समस्यांवरील उपाययोजनांसाठी नाविन्यपूर्ण कल्पना समोर आणणे, यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून ऑटोडेस्क फ्युजन- 360 मार्फत स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागातील विद्यार्थी सिध्देश्‍वर मडोळे, विश्‍वेश पाटील व ऋषिकेश लागली यांनी 25 हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले. 

हेही नक्‍की वाचा : खासदार डॉ. महास्वामींनी मूळ जात प्रमाणपत्र दिलेच नाही 

 

 

बेंगलोरमधील रेडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये पारितोषिक वितरण समारंभाचेळी ऑटोडेस्क कंपनीचे ग्लोबल कम्युनिटी हेड श्री. अभित व स्पर्धेचे परीक्षक तथा असोसिएशन ऑफ फिजिकल डिसेबिलिटी इंडियाचे डॉ. सेंथिल, डॉ. एस. एस. मेतन, प्रा. बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते. 
स्पर्धेच्या काळात स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी आणि वयस्क-वृध्दामधील पाठदुखीचा त्रास वाढू लागला आहे. जीवनाच्या सर्वोत्तम टप्प्यावर पाठदुखीने बेजार केल्यास आयुष्यातील स्वप्नांना तथा उद्दिष्टांना खीळ बसू शकते. आयटी क्षेत्रात खुर्चीवर बसून तासनतास्‌ काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सना पाठदुखीचा त्रास असल्याचा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणांमधून आढळतो. पाठदुखी ही सर्वकालीन समस्या असल्याने ऑटोडेस्क या कंपनीने त्यावरील उपाययोजनांसाठी स्पर्धा घेतली. त्यामध्ये ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने यश मिळविले आहे. प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक प्रा. वैभव कुलकर्णी व फिजिओथेरपिस्ट डॉ. संदीप भागवत यांचे कौतूक केले. 

हेही नक्‍की वाचा : राज्यातील 40 हजार शिक्षकांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता 

स्टार्टअपमधून आसन पोहचणार देशभर 
कॉलेजमधील इनक्‍युबेशन सेंटरच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप सुरु करीत आहोत. ज्यातून प्रोटोटाईप क्‍लिनिकल ट्रायल्समधून जाणे आवश्‍यक आहे. शिक्षणाच्या अंतिम वर्षापर्यंत स्टार्टमार्फत आयटी प्रोफेशनल्स, बॅंक कर्मचारी, आरक्षण केंद्र अशा ठिकाणी बैठे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे प्रॉडक्‍ट पोहोचवण्याचे नियोजन आहे. 
- सिध्देश्‍वर मडोळे, संशोधक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduced back pain AAURCHID ENGINEERING COLLEGE SOLAPUR STUDENTS REASEARCH