
करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाज, शिवप्रेमी संघटना याशिवाय समाजातील विविध संघटनाकडून केली जात होती.
करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय सर्वानुमते नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या कै.डी. के. सावंत सभागृहात शुक्रवारी (ता. 22) ही विषेश सभा बोलावण्यात आली होती. या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण जाधव, सचिवपदी शौकत नालबंद यांची निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.
सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
या सभेला मुख्यधिकारी वीना पवार, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक शौकात नालबंद, अतुल फंड, नगरसेविका राणी आव्हाड, भाग्यश्री किरवे, स्वाती फंड, शारदा राखुंडे, संजय सावंत, अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर, श्रीनिवास कांबळे, वंदना ढाळे, सीमा कुंभार, प्रमिला कांबळे, राजश्री माने, अविनाश घोलप, कन्हैयालाल देवी, सचिन घोलप उपस्थित होते. करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचा विचार करता शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय नगरपरिषदेच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. करमाळा तालुक्यातील विविध संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
हे ही वाचा : मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल; विशिष्ट पद्धतीनं तयार केलेल्या डाळींबाला जीआय मानांकन
करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाज, शिवप्रेमी संघटना याशिवाय समाजातील विविध संघटनाकडून केली जात होती. या सभेत पुतळा बसवण्याबाबत विशेष निर्णय झाला आहे. लवकरात लवकर पुतळा बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून समाजातील जास्तीत जास्त लोकांनी हा पुतळा बसविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
- प्रविण जाधव, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, करमाळा
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उपसमिती
अध्यक्ष प्रवीण जाधव, सदस्य वैभवराजे जगताप, अहमद कुरेशी, राणी आव्हाड, भाग्यश्री किरवे, स्वाती फंड, अतुल फंड, शारदा राखुंडे, संजय सावंत, अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर, श्रीनिवास कांबळे, वंदना ढाळे, सीमा कुंभार, प्रमिला कांबळे, राजश्री माने, अविनाश घोलप, कन्हैयालाल देवी, सचिन घोलप.