esakal | सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांची मागणी 

सरकारने केलेली मदत अपुरी 
शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला उतरून पंचनामे व पाहणी न करता सातबारा उताऱ्यावरून सरसकट फळबागांना प्रति हेक्‍टरी 60 हजार रुपये व उतर पिकांना प्रति हेक्‍टरी 30 हजार रुपये मदत देणे अपेक्षित होते. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. सरकारने केलेली मदत पुरेशी नाही. त्याचा फेरविचार करावा. 
श्रीकांत देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप. 

सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांची मागणी 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केला. जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सध्याच्या पूरपरिस्थितीमुळे मागील काही काळात आर्थिक अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पीक लागेल अशी परिस्थिती नाही. कांदा अनुदानापोटी मिळणारे 3 ते 4 कोटी शासनाकडे रखडले आहे. पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळाले नाही. गेल्यावर्षीचा पूरनिधी अद्यापही मिळाला नाही. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात घरगुती ग्राहक व शेतीपंपाची भरमसाठ विज बिले शेतकऱ्यांच्या माथी मारली आहेत. तरी शासनाने झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. 
सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट मदत करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, राम सातपुते यांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिली आहे.