"शिवभोजन'नंतर पंढरपुरात आता भाजपची "दीनदयाळ स्थाळी' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पंढपुरातील काही महिलांनी श्री महिला उद्योग या संस्थेची स्थापना केली होती. या महिलांनी शेंगदाणा लाडू, पापड व इतर खाद्यपदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली. भाजपने या महिलांनाबरोबर घेऊन दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. श्री विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ ही थाळी दिली जात आहे. चपाती, भात, भाजी, आमटी, ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे व पापड असे पदार्थ यात देण्यात येत आहेत.

सोलापूर : राज्यात शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्यानंतर आता त्याला उत्तर म्हणून येथील भाजपच्या कार्यकर्त्याने दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. अवघ्या 30 रुपयांत ग्राहकांना ही थाळी दिली जात आहे. 
पंढपुरातील काही महिलांनी श्री महिला उद्योग या संस्थेची स्थापना केली होती. या महिलांनी शेंगदाणा लाडू, पापड व इतर खाद्यपदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली. भाजपने या महिलांनाबरोबर घेऊन दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. श्री विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ ही थाळी दिली जात आहे. चपाती, भात, भाजी, आमटी, ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे व पापड असे पदार्थ यात देण्यात येत आहेत. दुपारी 12 ते 1 या वेळेतच ही थाळी दिली जात आहे. विशेष म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक या थाळीचा लाभ घेतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीची उद्‌घाटन झाले. भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या पुढाकाराने ही थाळी सुरू करण्यात आली आहे. बाजारातून भाजीपाला आणण्यापासून ते संपूर्ण थाळी ग्राहकांना देण्यापर्यंतचं काम या संस्थेच्या महिला करत आहेत. पंढरपुरात दररोज 30 हजाराच्या दरम्यान भाविक दर्शनसाठी येतात. याचा विचार करता आणि भाविकांचा आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहता जेवणाच्या वेळेत वाढ करण्यात येईल, तसेच पंढपूरसह इतर ठिकाणीही या योजनेचा विस्तार करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचं या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deendayal thali of BJP in Pandharpur