शारीरिक शिक्षण विषयाचा दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रातही राबवावा

दत्तात्रय खंडागळे 
Tuesday, 22 September 2020

राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा सदस्य पंचाक्षरी स्वामी म्हणाले, सर्वच शैक्षणिक स्तरावर शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत बदल करून दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयाला महत्त्व देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. 

सांगोला (सोलापूर) : शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासासाठी व शिक्षण घेण्यास सक्षम होण्यासाठी, सदृढ समाज निर्मिती, बलशाही भारतासाठी, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची अत्यावश्‍यक गरज निमार्ण झालेली आहे. 'आरोग्य व शारीरिक शिक्षण' आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्यासाठी दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाकडून करण्यात येत आहे. 

सध्या संपूर्ण जग कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर 'आरोग्य' या घटकावर अनूभव घेत आहे. आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे. या विषयाचे महत्व जाणून दिल्लीप्रमाणे प्राथमिक स्तरावर पूर्ण वेळ आरोग्य व शारीरिक शिक्षण शिक्षक (बीपीएड) आल्यास महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा (जिल्हा परिषदसह) सर्व नगरपालिका शाळा, महापालिका शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक यांची दिल्लीतप्रमाणे महाराष्ट्रातही अमंलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. माध्यमिक स्तरावर (बीपीएड) शाळा तेथे शिक्षक आणि 250 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक झाल्यास अनेक नवीन पदनिर्मितीही होईल. उच्च माध्यमिक स्तरावर (एमपीएड) किमान 500 विद्यार्थी व तासिका वाढ झाल्यास येथेही पदांची वाढ होईल. या मागण्यांसाठी सतत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे संदिप मनोरे, तायप्पा शेंडगे, जिल्हा सदस्य पंचाक्षरी स्वामी, प्रा.आश्वीनी मिसाळ यांनी केले आहे. 

राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा सदस्य पंचाक्षरी स्वामी म्हणाले, सर्वच शैक्षणिक स्तरावर शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत बदल करून दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयाला महत्त्व देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Delhi pattern of physical education should be implemented in Maharashtra as well