लॉज बंदचा ‘या’वर असा झालाय परिणाम

Demand for condoms due to lockdown
Demand for condoms due to lockdown
Updated on

सोलापूर : कोरोना विषाणूने सध्या जग कवेत घेतले आहे. त्याच्या धास्तीने सध्या लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून सरकारने कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. गर्दी कमी व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॉल, सिनेमागृह, लॉज, हॉटेल बंद आहेत. त्याचा परिणाम जसा इतर घटकांवर झाला आहे तसाच कंडोमच्या मागणीवरही झाला आहे.

हेही वाचा : सोलापुरात कोरोनामुळे बळी गेलेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात 52 व्यक्ती
गर्भनिरोधक गोळ्यांवर परिणाम...
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला. याच लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यात भाजीपाला, किराणा दुकाने, मेडिकल सुरू आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीत सुद्धा काही प्रमाणावर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम कंडोमच्या मागणीत झाला आहे. सुमारे ४० टक्क्याने कंडोमची मागणी घटल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे. इतर वेळी ग्राहक मोठ्या संख्येने कंडोम खरेदी करतात. सध्याच्या परिस्थितीत नेहमीच्या ग्राहकांपैकी ३० ते ४० टक्के ग्राहक लॉज बंद असल्याने कंडोम खरेदी करत नाहीत. कंडोमप्रमाणेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर सुद्धा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र, ही गोळी कोण अन्‌ कितीवेळा घेत आहे, त्याचे निरीक्षण करून घेण्यापूर्वी विक्रेत्याकडून जागृती केली जात असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनच्या काळापासून या गोष्टींचा खप कमी झाला आहे. 

हेही वाचा : सोलापूर शहरात मृत्यू झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
शारीरिक संबंधावर असा परिणाम... 

सोलापुरातील एक विक्रेते म्हणाले, जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान कंडोमच्या मागणीत ३० ते ४० टक्क्याने घट झाली आहे. नेहमी येणाऱ्या ग्राहकांपैकी आता येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कमी कंडोमच्या ग्राहकांवर लॉज बंद झाल्याचा परिणाम झाला आहे. शारीरिक संबंधासाठी काहीजण बाहेरची व्यक्ती शोधतात. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे एकांत मिळत नाही. याबरोबर घराबाहेर पडणेही अवघड होते. अनेकदा 'ते' दोघे सहमतीनेच बाहेर पडतात. तेव्हा ते हवं तिथे एकांतात भेटतात. मात्र, आता तशी परिस्थिती नाही.
सध्या मॉल्स, चित्रपटगृह, नाटकगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद आहेत. अनेक लोकांना खासगी कंपन्यांनी घरी बसून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेकजण घरीच बसून काम करत आहेत. कोरोनामुळे शारीरिक संबंधाबाबतही अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. एका न्यूज पोर्टलच्या बातमीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी दरम्यानच्या काळात शारीरिक संबंध कोणाशी आहेत हे महत्त्वाचे आहे. नेहमी असलेल्या व्यक्तीशी संबंध असतील तर अडचण नाही, पण या काळात नवीन व्यक्तींशी संबंध ठेवताना विचार करायला हवा. कोरोनामुळे देशभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे ग्राहकांच्या वस्तू खरेदी करण्याच्या शैलीमध्ये बदल झाल्याचे चित्र आहे.  गरजेच्या गोष्टींचा साठा करून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा : सोलापुरात पुण्यातून आले 90 हजार अन्‌ मुंबईतून 31 हजार 
महिलांकडून मागणी जास्त...

पूर्वी कंडोम विकत घेताना भारतीयांना लाज वाटायची, असं म्हटलं जातं. मात्र आता लैंगिक शिक्षण आणि माहितीचा प्रसार झाल्यामुळे अनेकांना कंडोमचे महत्त्व कळलं आहे. आता कंडोम खरेदीकडे तुलनेने सकारात्मक दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. कंडोम खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याचेही अनेक दुकानदार सांगतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात यावर परिणाम झाला आहे. कंडोम खरेदी करणाऱ्या पुरुषांपेक्षा महिला ग्राहकांची संख्या अधिक असते. अनेक महिला आता ग्राहक कंडोम खरेदी करतात, असं एका दैनिकाच्या ऑनलाइन बातमीत म्हटलं आहे. त्यात मुंबईमधील एका औषध विक्रेत्याचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आलं आहे. एका व्हायरसमुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये परिणाम होईल असा कधी विचारही केला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांबाबत बोलताना सोलापुरातील विक्रेते म्हणाले, या गोळ्या जास्त घेऊ नयेत, असे आवाहन आम्ही करत आहोत. एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदा गोळी मागितली तर त्याचे निरीक्षण ठेवले जाते. पुढच्यावेळी तीच व्यक्ती आली तर गोळी देण्याबाबत विचार केला जातो. अशा गोळ्यांमुळे भविष्यात गर्भधारणेवर परिणाम होतो. मेडिकलमध्ये कोणीही देत नाही, शक्यतो एकाच व्यक्तीच्या हाताने त्या दिल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com