esakal | उपमुख्यमंत्री अन्‌ चंद्रकांतदादा शुक्रवारी सोलापुरात 
sakal

बोलून बातमी शोधा

sahsra darshan

महास्वामींचीही उपस्थिती 
या सोहळ्यानिमित्त सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, होटगी मठाचे धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मंद्रूपचे गुरू रेणुक शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, जडीसिद्धेश्वर महास्वामी, मैंदर्गीचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू हिरेमठ, परमानंदवाडीचे अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी, शक्तीनगरचे निजगुन महास्वामी, मैंदर्गीचे मृत्युंजय महास्वामी, विजयपूरचे संगमेशशरणरू महास्वामी उपस्थित राहणार आहेत. 

उपमुख्यमंत्री अन्‌ चंद्रकांतदादा शुक्रवारी सोलापुरात 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील शुक्रवारी (ता. 31) सोलापुरात एकत्रित येणार आहेत. या दोघांशिवाय शेजारच्या आंध्रप्रदेशचे कामगारमंत्री गुम्मनुरू जयराम हे देखील सोलापुरात येणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र-प्रदेशातील नेते व महास्वामी शुक्रवारी सोलापुरात येणार आहेत. सोलापुरातील विमानतळ परिसरातील सदगुरू बसवारुढ महास्वामी मठाचे प्रमुख ईश्वरानंद महास्वामी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा शुक्रवारी (ता. 31) सकाळी 10 वाजता बसवारुढ महास्वामीजी मठात होणार आहे. 
हेही वाचा - अभिनेता भरत जाधव, विजय कदम येणार सोलापूरला 
या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भक्त, महास्वामी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवपुत्र महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता होम पूर्णाहुती, आठ ते नऊ अल्पोपाहार, नऊ ते दहा अप्पाजींचा मस्तकाभिषेक, सकाळी दहा ते बारा सभा कार्यक्रम व कार्यक्रमास आलेल्या महात्म्यांचे आशीर्वचन, मान्यवरांचे मनोगत होणार आहे. दुपारी 12 ते 1 अप्पाजींचा तुलाभार व आशीर्वचन, पादपूजा, महापूजा व दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. गुरुवारी व शुक्रवारी सकाळी नऊ ते 3 या वेळेत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर होणार आहे. या सोहळ्यास सोलापूर शहर व परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बसवारुढ महास्वामीजी मठातर्फे करण्यात आले आहे. 
हेही वाचा - पोलिस कोठडीत मारता...आत्ता घ्या... 
याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी, कलबुर्गीचे आमदार बसवराज मुत्तीमूड, आमदार दत्तात्रेय पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी खासदार अमरसिंह पाटील, सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, मोहन डांगरे, सचिन कोठाने आदी उपस्थित होते.