आरोग्य उपसंचालक म्हणाले ! 'रॅपिड ऍन्टीजेन'वर नाही भरोसा

तात्या लांडगे
Friday, 25 September 2020

सोलापूर : सोलापूरसह राज्यभरात रॅपिड ऍन्टीजेनचा जोर वाढला आहे. मात्र, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट ही पूर्णपणे भरोसा ठेवण्यायोग्य नाही. निगेटिव्ह रिपोर्ट आलेला पुन्हा पॉझिटिव्ह सापडत असून काही ठिकाणी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खासगी रुग्णालयातील टेस्टमध्ये निगेटिव्ह येत आहे. हा अनुभव सोलापूर महापालिकेतील एका गटनेत्याला आला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेण्याची मोहीम थांबविली असून आता केवळ संशयितांचीच नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून टेस्ट केली जात आहे.

 

सोलापूर : सोलापूरसह राज्यभरात रॅपिड ऍन्टीजेनचा जोर वाढला आहे. मात्र, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट ही पूर्णपणे भरोसा ठेवण्यायोग्य नाही. निगेटिव्ह रिपोर्ट आलेला पुन्हा पॉझिटिव्ह सापडत असून काही ठिकाणी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खासगी रुग्णालयातील टेस्टमध्ये निगेटिव्ह येत आहे. हा अनुभव सोलापूर महापालिकेतील एका गटनेत्याला आला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेण्याची मोहीम थांबविली असून आता केवळ संशयितांचीच नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून टेस्ट केली जात आहे.

 

राज्यात दररोज सरासरी 19 ते 20 हजार रुग्ण आढळत असून त्यात लक्षणे नसलेलेच सर्वाधिक आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 13 लाखांच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे. दुसरीकडे मृतांच्या संख्येने 34 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये सोलापूरसह नागपूर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे आणि मुंबई या शहरांची स्थिती चिंताजनक आहे. रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केल्यानंतर मृत्यूदर कमी झाला, परंतु मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा नंबर लागतो. रॅपिड टेस्टनंतर 30 मिनिटात रुग्ण निष्पन्न होतो आणि त्याच्यावर उपचार करणे शक्‍य होते, या हेतूने ऍन्टीजेन टेस्ट केली जात आहे. मात्र, त्यात निगेटिव्ह आल्यानंतर त्याच व्यक्‍तीचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने या टेस्टवर भरोसा ठेवायचा की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

'आरटीपीसीआर' टेस्ट खात्रीशीर

शहरातील सुमारे 49 हजार संशयितांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली आहे. आणखी 25 हजार किट्‌स शिल्लक असून या टेस्टमध्ये निगेटिव्ह येणाऱ्यांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने प्रभागनिहाय मोहीम बंद केली आहे. आता शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रांवर ही टेस्ट केली जात आहे. सोलापुरात शासकीय एक आणि खासगी तीन लॅब आहेत. दरम्यान, ऍन्टीजेनमध्ये काहींचे रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची बाधा झाली की नाही, याची खात्री करण्यासाठी 'आरटीपीसीआर' टेस्ट करुन घ्यायला हवी.
- डॉ. शितलकुमार जाधव, उपसंचालक तथा प्रभारी वैद्यकीय अधिकारी, सोलापूर

 

राज्यातील ऍन्टीजेन टेस्टिंगची स्थिती

  • एकूण टेस्टिंग लॅब
  • 409
  • 'आरटीपीसीआर' टेस्टिंग लॅब
  • 156
  • रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट
  • 6.80 लाख
  • पॉझिटिव्ह रुग्ण
  • 20 टक्‍के
  • लक्षणे नसलेले अंदाजित रुग्ण
  • 14 टक्‍के

नगरसचिवांचे पदाधिकाऱ्यांकडे बोट
महापालिकेच्या सभेला उपस्थित नगरसेवक कारोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्यांच्या थेट संपर्कातील व्यक्‍ती आणि लक्षणे नसलेल्यांनी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी, असे पत्र आरोग्य विभागाने नगरसचिव कार्यालयास दिले. त्यानुसार नगरसचिव कार्यालयाने संबंधित नगरसेवकांची यादी आरोग्य विभागाला दिली. मात्र, काहींनी रॅपिड टेस्ट करुन न घेता अनेकांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सभागृहात येणाऱ्यांचे ऑक्‍सिमीटरद्वारे तपासणी करण्यात आली होती. महापालिका सभागृहातील आसन क्षमता 110 असल्याने सर्वांना जागा पुरेल असे नियोजन केले होते. मात्र, नगरसेवकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, असे म्हणत नगरसचिव कायार्लयाने हातवर केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Director of Health said No reliance on rapid antigen test