esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

doctor.jpg

आरोग्य यंत्रणा व प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या कामात अडकले. मात्र, यात पक्षाघात, मधुमेह, रक्‍तदाब, किडनी विकार आदी आजारांच्या जुन्या रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यांना डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही गोळ्या विकत घेता येत नव्हत्या. केवळ पूर्वीपासून नियमित असलेले उपचार बंद झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नियमीत उपचार करणाऱ्या खासगी डॉक्‍टरांचे मार्गदर्शन मिळत नसल्याने या अडचणी झाल्या आहेत. 

मधुमेह, रक्तदाब व किडनी विकाराच्या रुग्णांचे हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः कोरोना संकटात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतल्याने व संसर्गाच्या भीतीने डॉक्‍टरांनी आखडलेल्या हाताचा परिणाम म्हणून मधुमेह, पक्षाघात, रक्तदाबसारखे आजार असलेल्या रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत. अनेक रुग्णांचे उपचार बाहेरच्या मोठ्या शहरात असल्याने त्यांना नियमीत उपचारासाठी जात येत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. 

हेही वाचाः राज्यातील बिगर कृषी पतसंस्थाच्या अंशदानाचा निर्णय लॉकडाउननंतर 

आरोग्य यंत्रणा व प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या कामात अडकले. मात्र, यात पक्षाघात, मधुमेह, रक्‍तदाब, किडनी विकार आदी आजारांच्या जुन्या रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यांना डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही गोळ्या विकत घेता येत नव्हत्या. केवळ पूर्वीपासून नियमित असलेले उपचार बंद झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नियमीत उपचार करणाऱ्या खासगी डॉक्‍टरांचे मार्गदर्शन मिळत नसल्याने या अडचणी झाल्या आहेत. 
अन्य आजाराचे जे रुग्ण सरकारी रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना संबंधित आजाराचे पुर्वी पासून सुरु असलेले उपचार नियमीत करण्याएैवजी आधी कोरोना संशयीत म्हणून तपासणी करावी लागत आहे. 

हेही वाचाः बापरे.....एकाच दिवशी कोरोनाने घेतला सहा जणांचा बळी 

शहरात 50 वर्षांच्या गृहस्थाला पूर्वी अर्धांगवायू व किडनीचा आजार होता. त्यांची नियमित तपासणी पूण्याच्या डॉक्‍टरांकडे होती. आजाराचा त्रास वाढल्याने नाईलाजाने त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे कोरोना तपासणीकरिता दाखल करून घेतले. तेव्हा त्यांनी आमच्या पूण्याच्या डॉक्‍टराकडे जाण्याची परवानगी मागीतली पण त्याचा उपयोग झाला नाही. तसेच त्यांचे पूर्वीचे उपचाराची औषधे बंद करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. अहवाल आला नसल्याने नातेवाइकांना मृतदेह ताब्यात दिला गेला नाही व चाचणीचा निकाल कळत नव्हता. या रुग्णाच्या कुटुंबात 15 महिन्यांचे बाळ व किडनी आजाराचा एक रुग्ण असल्याने त्यांना कोरोना होण्याच्या भीतीने चाचणीचा निकाल तातडीने हवा होता. तेथील रुग्णांची जास्त संख्या असल्याने दोन दिवस रुग्णाच्या नातेवाइकास काही माहिती मिळाली नाही. निदान मृतदेह तरी अंत्यसंस्कारासाठी ताब्यात द्या, अशी विनंती या कुटूंबाने केली. पण कोरोना टेस्ट अहवालाशिवाय कुणीच दाद देत नव्हते. एका राजकीय पदाधिकाऱ्याने हा प्रकार मंत्र्यापर्यंत पोचवल्यानंतर यंत्रणा हलली. नंतर रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. मृत्युच्या घटनेनंतर चार दिवसांनी त्या कुटुंबास मृतदेह ताब्यात देण्यात आला. अन्य आजाराच्या संकटात सापडलेल्या एका मातेच्या मुलाने फेसबुकवर त्यांच्या आईला पुणे येथे खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारा व्हिडीओ व्हायरल केल्यावर त्यास परवानगी मिळाली. डायलेसीसची सेवा न मिळाल्याने कीडनी आजाराच्या रुग्ण दगावल्याची घटना देखील घडली

go to top