सांगोला, दक्षिणमधील लिंग गुणोत्तर कमी का? कारणांचा शोध घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

District Collector Milind Shambharkar directed the health department to plan for an increase in the number of deliveries in government hospitals
District Collector Milind Shambharkar directed the health department to plan for an increase in the number of deliveries in government hospitals

सोलापूर : बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी 107 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घ्या, जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर 960 इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. शासकीय दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय टास्क फोर्स बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, महिला व बाल विकास अधिकारी एन. एस. काळे, पोलिस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदाच्या (पीसीपीएनडीटी) जिल्हा समन्वयक ऍड. रामेश्वरी माने, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी मिलिंद मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे, सुधीर ढाकणे आदी उपस्थित होते.

श्री. शेख यांनी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरची तालुकानिहाय स्थितीची माहिती दिली. श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेचे जाळे मोठे आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएचएफएस) मधील बाबींचे प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि बाल विकास विभागाने करावे. सोनोग्राफी केंद्रांची धाडसत्रे करून वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

दत्तक पालक योजनेचे नियोजन
 
जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पोषण अभियानांतर्गत आहाराचे वितरण करण्यात येत आहे. अंगणवाड्या आयएसओ करण्याचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असून, सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून नियोजन सुरू आहे. कमी वजनाची बालके सामान्य स्थितीत येण्यासाठी "दत्तक पालक योजना' राबविण्यात येणार आहे, असे श्री. शेख यांनी सांगितले.

संपादन : सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com