विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
ग्रामदैवताची यात्रा पारंपारिक पध्दतीने परंतु, मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी, यासाठी आमदार संजय शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा केला. आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची भेट घेतली. दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनीही श्री. निबांळकर, जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. राव हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यात्रेसंबंधी निर्णय घेणार आहेत. यामुळे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त मानाचे सात नंदीध्वज मिरवणुकीस परवानगी द्यावी, प्रत्येक नंदीध्वजासोबत 25 मानकऱ्यांना परवानगी द्यावी, नंदीध्वज मार्गावर 144 कलम लागू करा, अशी मागणी आमदार संजय शिंदे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर आज (मंगळवारी) आमदार संजय शिंदे यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. याबाबत आज निर्णय होणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
ग्रामदैवताची यात्रा पारंपारिक पध्दतीने परंतु, मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी, यासाठी आमदार संजय शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा केला. आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची भेट घेतली. दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनीही श्री. निबांळकर, जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. राव हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यात्रेसंबंधी निर्णय घेणार आहेत. यामुळे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
श्री सिध्दरामेश्वर यात्रेचा निर्णय सकारात्मक घ्यावा, अशी मागणी करीत आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विलास लोकरे, मिलिंद गोरे, अमित रोडगे, अजित शेडजाळे, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार संजय शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. विभागीय आयुक्तांनी सोमवारी (ता. 28) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून यात्रेसंबंधीची माहिती घेतली होती.