स्मार्ट करिअर व स्पर्धा परिक्षांमधील यशासाठी 'हे' मल्टीपल इंटेलिजन्स आपल्यात आहेत का? जाणुन घ्या 

career2.jpg
career2.jpg

सोलापूरः कॉलेजला शिक्षण सुरु केल्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या व्यक्तीमत्वाला कशा पध्दतीने आकार देतो हे महत्वाचे ठरते. मल्टीपल इंटेलीजन्स थेअरी (बहुबुद्धी तंत्र) व्यक्तीमत्व विकासाच्या व आव्हानात्मक करिअर, स्पर्धा पऱिक्षांची तयारी साठी ही थेअरी उपयोगाला येऊ लागली आहे. करिअर क्षेत्रात या इंटेलिजन्सच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मुल्यांकन करून त्यास दिशा देणे सोपे होऊ लागले आहे. 

व्यक्तीमत्व विकासामध्ये या पुुर्वी पारंपारिक पध्दतीमध्ये केवळ शारिरीक क्षमता, बुध्दीमत्ता व संवाद कौशल्ये यालाच महत्व असायचे. मात्र इंटेलिजन्स थेअरीने व्यक्तीमत्वामधील अनेक नविन पैलु देखील प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे. 
या थेअरीनुसार विवीध प्रकारची इंटेलिजन्स व्यक्तीमत्वामध्ये असू शकतात. त्यासोबत प्रत्येकाची जडणघडण, कुटुंब व सामाजिक स्थिती याचा परिणाम त्यामध्ये प्रभावी असतो. अनेक वेळा स्वतःमधील कोणता इंटेलिजन्स प्रभावी हे ओळखता आले तर त्याचा उपयोग करिअरसाठी महत्वाचा ठरतो. 

यामध्ये शारिरिक क्रियात्मकता हा पहिला इंटेलिजन्स आहे. व्यायाम,नृत्य व खेळासारख्या नियमित शारिरीक हालचाली हे महत्वाचे आहे. तसेच चित्रकला, मुर्तीकला, रंगकाम, हस्तकला सारख्या विवीध कलांमधील सुबकता या दोन क्षमता स्वतंत्रपणे विकसित होतात. बौध्दीक क्षमतेमध्ये तार्किक क्षमता व गणितीय कौशल्ये ही समाविष्ट आहेत. गणिती प्रक्रियामध्ये अधिक रुचीने काम करणे किंवा केवळ हिशेबापुरते गणित उपयोगात आणणे यांचा विचार या क्षमतेमध्ये केला जातो. 
इंट्रापर्सनल इंटेलिजन्समध्ये स्वतःचे वर्तन, स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जाण, आत्मपरिक्षण, एखाद्या अनुभवाद्वारे धडा घेत निर्णय घेणे व स्व मुल्यांकनाच्या क्षमतांचे मुल्यमापन या मध्ये केले जाते. 
इंटर पर्सनल क्षमतामध्ये सामाजीक बुध्दीमत्ता व लोकांमध्ये स्वतःचे स्थान निश्‍चित करण्याचा प्रयत्न होतो. अनेक राजकीय व सामजिक क्षेत्रातील व्यक्ती लोकांच्या जीवनाशी एकरुप होत याच क्षमतेवर नेतृत्व गूण विकसीत करत असतात. व्हीज्युअल म्हणजे दृष्टीकोन क्षमतेमध्ये व्यक्ती स्वतःची आत्मीकशक्तीची मुल्ये व परिस्थितीबाबतचे अवलोकन करण्याची क्षमता जोखली जाते. यामध्ये एखाद्या मुद्‌द्‌याच्या बाबतीत चांगली व वाईट परिणामांची स्पष्ट जाणीव करुन घेत निर्णयाप्रत येणे. प्रशासकीय सेवांसाठी होणाऱ्या परिक्षांमध्ये ही क्षमता अत्यंत महत्वाची मानली जाते. 
भाषिक क्षमतेमध्ये भाषेशिवाय संवाद, भाषेच्या आधारावरील संवाद याला महत्व दिले जाते. 
म्युझिकल क्षमतेमध्ये एखादी संगीत रचना  ऐकून जसेच्या तसे गाणे, स्वतः स्वतंत्रपणे संगीत रचना करणे, संगीताच्या लय व तालाच्या ध्वनीवर लक्ष केंद्रीत करणे, संगीताचे परिक्षण करणे या क्षमता ओळखल्या जातात. 
नॅचरॅलिस्टीक इंटेलिजन्समध्ये निसर्गाचा अभ्यास, झाडे, प्राणी यांच्याशी असलेले सहज नाते हे महत्वाचे ठरते. स्पर्श, रुप, रस, गंध, श्रवण यासारख्या विवीध संवेदनाआधारे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता देखील महत्वाची ठरते. अनेकदा दिव्यांग विद्यार्थी या संवेदनाच्या आधारे मोठी प्रगती करत असल्याची उदाहरणे आढळतात. या क्षमताच्या आधारे करिअर करताना प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तीमत्वातील विवीध क्षमता स्पष्टपणे कळू शकतात. तसेच पालकांना त्यांच्या मुलांच्या क्षमतांचे मुल्यमापन करून त्याच्या प्रगतीची दिशा ठरवता येते. 


विद्यार्थी करताहेत करिअरसाठी उपयोग 
व्यक्तीमत्व विकासाच्या संदर्भात या प्रकारच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व पालकांना मुलांच्या करिअर बाबत उत्तम निर्णय घेता येतो. पाल्यांच्या अनेक सुप्त क्षमताचे निरिक्षण या द्वारे करून पालकांना त्यांच्या पाल्यासाठी उत्तम करिअरची संधी देता येते. 
- प्रियांका निमीष गांधी, व्यक्तीमत्व विकास तज्ञ. सोलापूर 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com