बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीनंतर शेतकऱ्याकडून दुबार पेरणीची कामे सुरू

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

मृग नक्षत्रात तालुक्‍यामध्ये लवकर पावसाची हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस सुरुवात केली. त्यामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, मुग आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या दराचे बियाणाची खरेदी केली. 

मंगळवेढा(सोलापूर) ः खरिपासाठी पेरलेल्या बियाणाची उगवण नसल्याचे प्रकार तालुकाभरात अनेक ठिकाणी घडले. नंतर पावसाळी वातावरण पाहून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची कामे सूरू केली आहेत. 

हेही वाचाः अगोदर ऍक्‍शन प्लॅन मग सोलापूरचा लॉकडाउन 

मृग नक्षत्रात तालुक्‍यामध्ये लवकर पावसाची हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस सुरुवात केली. त्यामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, मुग आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या दराचे बियाणाची खरेदी केली. 

हेही वाचाः पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप 

पेरणीसाठी बैल उपलब्ध न झाल्यामुळे ट्रॅक्‍टर पेरणीचा आधार घेतला. डिझेलच्या दरवाढीमुळे पेरणीसाठी मागेल तो दर देऊन पेरणी केली. तालुक्‍यामध्ये सूर्यफुलाच्या क्षेत्रात वाढ झाली असताना त्यांनी पेरणी केलेल्या शेतकऱ्याचे बियाणे उगवलेच नसल्याचे प्रकार घडले. काही शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी कार्यालयाकडे या संदर्भातील तक्रारी देखील केल्या. 
परंतु या तक्रारीची दखल या शासकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. शासकीय अधिकारी आणि बियाणे उत्पादन उत्पादक कंपन्यांचे काही साटेलोटे असल्याचा सूर शेतकरी वर्गातून निघू लागला. बहुतांश शेतकऱ्यांनी व्यवस्थित उगवण न झाल्यामुळे पावसाचा अंदाज पाहता शेतकरी दुबार पेरणीच्या कामाला लागले आहेत. दुसऱ्यांदा बियाणे खरेदी करून त्याची पेरणी करावी लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

बारा पिशव्या बियाणे वाया गेले 
दहा एकर क्षेत्रासाठी 12 पिशव्या सुर्यफूलाची पेरणी केली. मात्र बियाणे उगवण झाली नसल्याची तक्रार पंचायत समितीकडे 2 जुलैला दाखल केली. तरी पाहणीसाठी अद्याप कोणीच फिरकले नाही. त्यामूळे त्याच कंपनीच्या बियाणास दुबार पेरणी सुरू केली. 
- नागनाथ पाटील,शेतकरी भाळवणी 

समितीकडून पाहणीनंतर निर्णय 
उगवण न झाल्याची तक्रार फोनवरूनही समजली असून दाखल तक्रारीबाबत सोमवारी या संदर्भातील नियुक्त समिती सदस्याद्वारे पाहणी करून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. 
- विनायक तवटे. कृषी अधिकारी पंचायत समिती 

कंपनीकडून प्लॉट पाहणीनंतर चौकशी होईल 
कमी पाऊस आणि बियाणे खोलवर टाकल्यामुळे उगवण होण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर पाहणी करून चौकशी करण्यात येईल. 
- दत्तात्रय व्हरे, बियाणे कंपनी प्रतिनिधी  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double sowing started by the farmer after the complaint of non-emergence of seeds