अगोदर ऍक्‍शन प्लॅन मग सोलापूरचा लॉकडाउन 

प्रमोद बोडके
Saturday, 4 July 2020

लॉकडाउन करत असतानाच सोलापूरातील एक लाख नागरिकांची रॅपीड अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यावर उपचाराची, अलगीकरण व विलगीकरणाची सर्व व्यवस्था झाल्यानंतरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन घेण्यापुर्वी अगोदर ऍक्‍शन प्लॅन व नंतर लॉकडाउनची घोषणा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी दिली. 

सोलापूरः सोलापूर शहर व जिल्हयात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या व मृतांची संख्या कमी करण्यासाठी लॉकडाउन घेण्यात येणार असल्याचे संकेत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. 

हेही वाचाः बार्शीतील गर्दी व बेशिस्तीला आताच घाला पायबंद असे कोण म्हणाले? ते वाचा 

लॉकडाउन करत असतानाच सोलापूरातील एक लाख नागरिकांची रॅपीड अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यावर उपचाराची, अलगीकरण व विलगीकरणाची सर्व व्यवस्था झाल्यानंतरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन घेण्यापुर्वी अगोदर ऍक्‍शन प्लॅन व नंतर लॉकडाउनची घोषणा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी दिली. 
सोलापूरचा लॉकडाउन हा अचानक केला जाणार नाही. किमान पाच दिवस अगोदर लॉकडाउन बाबत कल्पना देऊन या लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेताना लोकप्रतिनिधी, व्यापारी,नागरिक यांच्याशी चर्चा केली जाईल असे ही त्यांनी सांगितले. 

लॉकडाउनसाठी नागरिकांनी पालकमंत्र्यासमोर जोडले हात 
सोलापूर शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात आज पालकमंत्री भरणे यांनी आज दौरा केला. या दौऱ्यात 80 टक्के नागरिकांनी लॉकडाउनची मागणी केली असल्याचे पालकमंत्री यांनी सांगीतले.आम्ही मिठाचे पाणी व भाकरी खाऊ पण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन घ्याच अशी मागणी नागरिकांनी आपल्याकडे केली असल्याची माहीती पालकमंत्री श्री.भरणे यांनी सांगीतले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First the action plan then the lockdown of Solapur