80 वर्षाच्या शेतकरी आजोबाची पत्नीसह दुबार पेरणी, डोळ्यात टचकन पाणी आणणारा व्हिडीओ 

Double sowing with the wife of an 80 year old farmer in solapur
Double sowing with the wife of an 80 year old farmer in solapur

बार्शी (सोलापूर) : मूलबाळ नसलेल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला इवल्याशा पोटाची खळणी भरण्यासाठी वयाच्या 80 व्या वर्षीही काबाडकष्ट चुकले नाही. कष्टाला नाही न म्हणणाऱ्या या दाम्पत्याची निसर्गाने जणू परीक्षा घेणेच सुरू केले आहे. त्यातच बियाणे कंपन्यांच्या बोगस बियाण्यांमुळे पहिल्या पावसात सोयाबीनची पेरणी करूनही बियांची उगवण न झाल्याने या शेतकरी दाम्पत्याच्या पदरी निराशाच पडली आहे. तरीही कष्टाने त्यांनी पुन्हा पेरणीला सुरवात केली आहे. स्वत: तयार केलेले पेरणीयंत्र आजीने समोरून ओढले तर आजोबांनी पीक पेरलं. याचा व्हिडिओ व्हायरल सध्या व्हायरल होत आहे. 

धामणगाव (ता. बार्शी) येथील मूलबाळ नसलेले नरहरी ढेकणे आणि त्यांची पत्नी सोजर ढेकणे यांना वयाच्या 80व्या वर्षीही संसाराचा गाडा स्वत:लाच ओढावा लागत आहे. या दाम्पत्याकडे राहायला पक्के घरही नाही. शेतातच पत्र्याचे शेड आहे. जी काही जमीन आहे, त्यावर जमेल तेवढं पीक घ्यायचं आणि ते विकून आपलं पोट भरायचं, असा त्यांचा एकमेव दिनक्रम आहे. मात्र कोरोना विषाणूच्या दुष्टचक्रात या वृद्ध दाम्पत्यावर अस्मानीसह बियाणे न उगवल्याने सुलतानी संकट ओढवले आहे. मोठ्या कष्टाने शेतात सोयाबीनची पेरणी केली होती; पण शेतात पेरलेल्या बिया उगवल्याच नाहीत. बोगस बियाणांमुळे या वृद्ध दाम्पत्याची फसवणूक झाली. मात्र या वयात कुणाशी जाब विचारायची किंवा तक्रार करण्याची सोय नाही. मन खंबीर करून त्यांनी पुन्हा एकदा दुबार पेरणीचा निर्णय घेतला व लागलीच कामालाही लागले. 

त्यांच्या काबाडकष्टाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला अन्‌ अनेकांच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. त्यांच्यासाठी आता मदतीचे हात पुढे येत असून गावातील काहींनी अन्नधान्याची मदत केली आहे. एकीकडे कोरोनाचं संकट आणि त्यात अस्मानी संकटाने या वृद्ध बळीराजा दाम्पत्याचे हाल झाले. तरीही या दाम्पत्याचा धीर खचला नाही. त्यांनी पुन्हा एकदा दुबार पेरणीचा निर्णय घेतला. बैल बारदाना नसल्याने संघर्ष करत स्वत: राबावे लागत असल्याने अनेकांचे डोळे पाणावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com