डॉ. राजेंद्र भोसले झाले अतिरिक्त आयुक्त 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

निरोप अन्‌ स्वागत समारंभ 
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा स्वागत समारंभ आणि निरोप समारंभ शनिवारी (ता. 15) दुपारी 12 वाजता सोलापुरातील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात होणार आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तीन वर्षाच्या कालावधीत विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत. अनेक संवेदनशील विषय त्यांनी शांततेत हाताळले आहेत. पंढरपूर विकास आराखडा, सोलापुरातील दुष्काळ आणि महापूराचे नियोजन, लोकसभा व विधानसभा निवडणूक अशा महत्त्वाच्या घडामोडींमध्ये डॉ. भोसले यांचे प्रशासकीय कौशल्य सोलापूर जिल्ह्याने पाहिले आहे. 

सोलापूर : सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची आज पुन्हा बदली झाली आहे. सोलापुरातून त्यांची बदली कल्याण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली होती. त्यांच्या बदलीचा आदेश आज निघाला असून अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/stealing-sand-openly-bhima-river-pandharpur-261961">हेही वाचा - पंढरपूर तालुक्‍यात भीमेतून खुलेआम वाळू चोरी 
डॉ. भोसले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी जाण्यास अनुत्सुक असल्याचे दिसले. पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी त्यांची बदली होईल अशीही चर्चा मधल्या काळात रंगली होती. आज अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांचीही बदली आज झाली असून त्यांची नियुक्ती शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारीपदी करण्यात आली आहे. शासनाने गुरुवारी काढलेल्या बदल्यांच्या आदेशात नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी पी. शिवा शंकर यांची बदली करण्यात आली होती. डोंगरे यांना कोणत्या ठिकाणी नियुक्ती मिळणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Rajendra Bhosale becomes additional commissioner