म्हणून तो गाडी चालवायचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

जीपमध्ये पंचायत समिती, बार्शी येथील कर्मचारी घेऊन जात असताना अपघात झाला. त्यात चालक संदीप घावटेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वैराग ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पांढरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. पांगरी येथील नीलकंठ उत्रेश्‍वर कदम (वय 34) हे अपघातात जखमी झाले आहेत.

पांगरी (सोलापूर) : राळेरास-शेळगाव दरम्यान झालेल्या अपघातात पांढरी (ता. बार्शी) येथील चालकाचा जागीच मृत्यू झाला. पांगरी (ता. बार्शी) येथील एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच पांढरी गावात शोककळा पसरली. घरची प्रतिकूल परिस्थिती असल्याने आई-वडिलांना संसारात हातभार लावण्यासाठी संदीप पांडुरंग घावटे (वय 24) दोन वर्षांपासून जीप चालवत होता. मिळेल ते भाडे करत होता.

जीपमध्ये पंचायत समिती, बार्शी येथील कर्मचारी घेऊन जात असताना अपघात झाला. त्यात चालक संदीप घावटेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वैराग ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पांढरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. पांगरी येथील नीलकंठ उत्रेश्‍वर कदम (वय 34) हे अपघातात जखमी झाले आहेत. ते करमाळा पंचायत समितीत "उमेद'चे तालुका समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. ते आज सोलापूर येथे कामानिमित्त जात होते. पांगरी येथील रागिणी मोरे-वासकर या अडीच वर्षांपासून बार्शी पंचायत समितीत "उमेद'चे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
रुग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणा 
वैराग :
सोलापूर- बार्शी रस्त्यावर राळेरास- शेळगाव (आर) जवळ क्रूझर व एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतदेह उचलले अन्‌ अपघातातील जखमींना नेण्यास शेळगाव (आर) येथील प्राथमिक उपकेंद्राची 108 ऍम्ब्युलन्स तत्परतेने धावली. त्यातून रुग्ण जखमींना सोलापूर येथे सोडून ऍम्ब्युलन्स परत शेळगाव येथे आली. तेव्हा गाडी स्वच्छ करताना रुग्णवाहिकेत गुलाबी खडा असलेली सोन्याची अंगठी चालक रमजान शहाबुद्दीन शेख व डॉ. अमोल दत्तात्रय गोसावी यांना सापडली. सदरची अंगठी जखमी अथवा मृतापैकीच कोणाची तरी आहे. म्हणून शेख यांनी वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमित घाडगे व धनाजी रामगुडे यांच्याकडे आणून दिली. जे गेले ते गेले, जे तरले ते सोन्याच्या अंगठीप्रमाणे जगू दे, कोणाची असेल त्यांना ती अंगठी द्या. हे वाक्‍य उपस्थितांना कर्तव्य जपत प्रामाणिकपणा जिवंत असल्याने हृदयद्रावक वाटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver dies in road accident on Solapur Barshi