मध्यम प्रकल्पात नऊ टक्के पाणीसाठा; अद्यापही दोन प्रकल्प "मायनस'मध्ये

Medium Project
Medium Project
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात यंदा चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे असलेल्या सात मध्यम प्रकल्पांपैकी दोन मध्यम प्रकल्प अद्यापही "मायनस'मध्ये आहेत. उर्वरित पाच प्रकल्पांचा पाणीसाठा "प्लस'मध्ये आला आहे. 

जून महिन्याच्या सुरवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मात्र, जोरदार पाऊस पडण्याऐवजी लहान पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प 100 टक्के भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे. मोठा पाऊस पडल्यास पुढील काही दिवसांमध्ये सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. 

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे एकरुख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी, पिंपळगाव ढाळे हे मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी हिंगणी प्रकल्पात वजा 22 तर ढाळे पिंपळगावमध्ये वजा 12 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. याशिवाय उर्वरित सर्व प्रकल्पांतील पाणीसाठा "प्लस'मध्ये आला आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 50 टक्‍क्‍यांच्या पुढे गेले आहे. पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणेही भरल्यामुळे त्यातूनही भीमा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये उजनी धरण 100 टक्के भरणार आहे. 

प्रकल्पाचे नाव व उपयुक्त पाणीसाठा टक्‍क्‍यांमध्ये 
एकरुख ः 17.92, हिंगणी ः वजा 22.51, जवळगाव ः 19.01, मांगी ः 10.30, आष्टी ः 31.81, बोरी ः 3.84, पिंपळगाव ढाळे ः वजा 12.78 टक्के 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com