मंगळवेढा तालुक्‍यात कमी दर व किडीच्या त्रासाने मका लागवड घटली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे तालुक्‍यामध्ये पेरणीच्या कामाला वेग आला. जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे बहुतांश शेतकरी शेतकऱ्यांनी नवीन बैलाची खरेदी करण्यास अड़चणी आल्या. त्यांच्यासमोरही पेरणी करण्याचे संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत सध्या तालुक्‍यामध्ये ट्रॅक्‍टर पेरणीला जास्त मागणी झाली. 

मंगळवेढा(सोलापूर)ः मका पिकासाठी लागणारे जादा पाणी, वारंवार पडणारी किड आणि नियंत्रणासाठी होणाऱ्या वाढीव खर्चामुळे यंदा तालुक्‍यात मकेचे क्षेत्र कमी झाले आहे. त्या एैवजी तालुक्‍यात सूर्यफुलाच्या क्षेत्रात मात्र यंदा वाढ झाली. 

हेही वाचाः पंढरपूरचे नितीन खाडे आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी 

यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे तालुक्‍यामध्ये पेरणीच्या कामाला वेग आला. जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे बहुतांश शेतकरी शेतकऱ्यांनी नवीन बैलाची खरेदी करण्यास अड़चणी आल्या. त्यांच्यासमोरही पेरणी करण्याचे संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत सध्या तालुक्‍यामध्ये ट्रॅक्‍टर पेरणीला जास्त मागणी झाली. 
तालुक्‍यांमध्ये खरीप हंगाम मध्ये बाजरी, तूर, सुर्यफूल ही पिके प्राधान्याने घेतले जातात. त्याच्या जोडीला कडधान्य आणि जनावरांना पशुखाद्य म्हणून मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु गेल्या दोन वर्षात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. या पीकाला जादा पाणी लागत होते. या दोन कारणामूळे मक्‍याच्या क्षेत्रात तालुक्‍यामध्ये घट झाली आहे. मागील वर्षी मक्‍याचे क्षेत्र 3855 हेक्‍टर एवढे होते. या वर्षी 3418 हेक्‍टरवर पेरणी झाले आहे. मागील वर्षी सुर्यफुलाचे क्षेत्र केवळ 38 हेक्‍टर एवढे होते ते या वर्षी 3822 हेक्‍टरपर्यंत पोहचले आहे. 

हेही वाचाः माढ्यात कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध 

या उलट सूर्यफुलाच्या क्षेत्रात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात सुर्यफूलाला मिळालेला दर, पिक विमा भरपाई आणि कमी पाण्यात येणारे पीक ही कारणे त्यासाठी महत्वाची ठरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पीकाच्या लागवडीकडे कल वाढला. 
तालुक्‍यामध्ये खरीपासाठी 17 हजार 320 हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. सध्या 11 हजार 859 हेक्‍टर वर पेरणी झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्र व कंसात प्रत्यक्ष पेरणी झालेले पीकनिहाय क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे. 
ज्वारी 1218 हे.(420हे. ), बाजरी 10917 (4690), मका 3855 (3418), तूर 134 (23), उडीद 22.75 (31), मूग 384.44,(66), भुईमूग 228 (258), सूर्यफूल 38.64 (822.4) 

मकेचे दर व किडीचा विचार करून पीक बदल 
मकेचे दर व किडीचा विचार करता शिवाय जिराईत शेती आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाठी दोन पिके घ्यावी लागतात. कमी पाण्यावर व कालावधीतील सूर्यफुलाचे पीक घेतल्यामुळे रब्बीसाठी दुसरे पीक घेता येणे शक्‍य असल्याने सुर्यफुलाची पेरणी केली. 
महादेव बुध्याळकर,शेतकरी डोणज 

दुसरे पीक घेण्याची मिळते संधी 
ज्या शेतकऱ्यांना मका पीकाच्या अळीवर नियंत्रण मिळवता शक्‍य झाले नाही. त्या शेतकऱ्यांनी यंदा मकेऐवजी सूर्यफुलाचा आधार घेतला. शिवाय यंदा समाधानकारक पावसाने लवकर पेरणी झाली. सूर्यफुलाच्या पीक कमी काळात येत असल्यामुळे ज्वारी, हरभरा,करडई हे दुसरे पीक घेता येणे शक्‍य होते. त्यामुळे सूर्यफुलाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 
चंद्रकांत जांगळे, तालुका कृषी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to low price and infection maize field lowered in mangalvedha taluka