पंढरपूरचे नितीन खाडे आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी 

अभय जोशी 
Thursday, 2 July 2020

आसाममधील निवडणुकीचे आव्हानात्मक काम 
आसाम विधानसभेची निवडणूक एप्रिल-मे 2021 मध्ये होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा राबवणे आव्हानात्मक काम त्यांच्यावर असणार आहे

पंढरपूर (सोलापूर) : मूळचे पंढरपूरचे व सध्या आसाममध्ये कार्यरत असलेले नितीन शिवदास खाडे (आयएएस) यांची आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, आसाम विधानसभेची निवडणूक एप्रिल-मे 2021 मध्ये होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा राबवणे आव्हानात्मक काम त्यांच्यावर असणार आहे. 
श्री. खाडे यांनी पुणे येथून लॉची पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. आसाममध्ये विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. महाराष्ट्रात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे परिवहन सेवेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणूनदेखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या ते आसाममध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या उत्तम कामाची दखल घेऊन भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने त्यांची आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. नितीन खाडे हे श्री विठ्ठल सहकारी आणि चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक कै. एस. डी. खाडे यांचे पुत्र आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Khade of Pandharpur is the Chief Election Officer of Assam