
या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. अवैद्य मळीची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही कारवाई करण्यात आली.
सोलापूरः सोलापूर-तुळजापूर महामार्गावर अवैद्य मळी वाहतूक करणारा टेम्पो पकडून त्यातील सात लाख 84 हजारांच्या 37 लोखंडी बॅरलसह 10 मे. टन मळी जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. अवैद्य मळीची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही कारवाई करण्यात आली. सोलापूरहून तुळजापूरकडे (क्र. एम. एम. 13/ एक्स 4437) हा मळीने भरलेला ट्रक भरधाव वेगाने जात होता. पथकाने पाठलाग करुन त्याची चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने ट्रकची पाहणी केली असता अवैध मळी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे आयुक्त उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक रवींद्र आवळे, उपअधीक्षक पवार, निरीक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक मुंबईचे एम. एम. चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, मलंग तांबोळी, गजानन होळकर यांनी ही कामगिरी केली. तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे करीत आहेत.