"त्या' महिलेच्या संपर्कातील आठ जण क्वारंटाइन 

"त्या' महिलेच्या संपर्कातील आठ जण क्वारंटाइन 
Updated on

कुर्डू (सोलापूर) : लऊळ (ता. माढा) येथील 39 वर्षीय महिलेचा कोरोनाने सोलापुरात मृत्यू झाल्याने माढा तालुक्‍यातील गावांत घबराट निर्माण झाली आहे. 

परिसर सील करण्यात आला 
या वस्तीवरील एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. या ठिकाणाला उपविभागीय प्रांताधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण यांनी भेट दिली. 

वसतिगृहात क्वारंटाइन 
महिलेचा पती शुक्रवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान सोलापूरहून लऊळला आल्यानंतर त्यांच्यासह संपर्कातील त्या महिलेचे आई, वडील, मुलगा, सून, नात व लऊळ गावातील डॉक्‍टर व अन्य असे आठ जणांना के. एन. भिसे कॉलेज, परांडा रोड, भोसरे येथील महिला वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले. तर, उर्वरित 32 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सहा जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात आले. सील करण्यात आलेल्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

डॉक्‍टरने 103 रुग्ण तपासले 
गावातील त्या डॉक्‍टरने 3 जून रोजी 15 गावांतील 103 रुग्ण तपासले आहेत. ती महिला दवाखान्यात येऊन गेल्यानंतर 84 रुग्णांची तपासणी केल्याची माहिती तपासात पुढे आली. त्या गावात लऊळ येथील डॉक्‍टरशी संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश प्रशासनाने गाव समितीला दिले आहेत. 

रुग्ण तपासल्याची यादी 
लऊळ (51), पडसाळी (19), अरण (एक), उजनी (14), भेंड (दोन), परिते (एक), पिंपळखुंटे (एक), भुताष्टे (पाच), व्होळे खु. (तीन), बावी (एक), मोडनिंब (एक), म्हैसगाव (एक), कुर्डुवाडी (एक), कुर्डू (एक), दहीवली (एक).  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com