एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 19 January 2021

कोरोनामुळे जगभरातील गिर्यारोहन थांबलेले असताना भारतीय हिमालय व गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतातुन विश्वविक्रम केला होता. देशभरातून साधारणपणे 900 गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता. या बद्दल सोलापूरचे गिर्यारोहक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना याबाबत नुकतेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

सोलापूरः हिमालय पर्यटनाला चालना मिळावी यासाठी येथील एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी त्यांच्या एक्‍स्प्लोरर 360 या ग्रुपच्या समवेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक छायाचित्रे अपलोड करून विक्रम स्थापीत केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. 
कोरोनामुळे जगभरातील गिर्यारोहन थांबलेले असताना भारतीय हिमालय व गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतातुन विश्वविक्रम केला होता. देशभरातून साधारणपणे 900 गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता. या बद्दल सोलापूरचे गिर्यारोहक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना याबाबत नुकतेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र मिळाले आहे. 
कोरोनानंतर जगभरातील गिर्यारोहण बंद आहे. मात्र भारतातील देशातील गिर्यारोहण सध्या सुरू आहे. त्याची संधी साधून जगभरातील गिर्यारोहकांना भारतीय हिमालयाकडे आकर्षित करण्यासाठी भारतातील अनेक मोठ्या गिर्यारोहकांनी हा विक्रम प्रस्थापित केला आहे. हैदराबाद येथील शेखर बाबू यांनी याबाबत मोलाची कामगिरी बजावली होती. या विश्वविक्रमामार्फत 360 एक्‍सप्लोरर या ग्रुपने ही यासाठी अतिशय भरीव कामगिरी केली होती. 

पुढेही नवी कामगिरी करणार 
भारतातील गिर्यारोहण व हिमालयाच्या प्रसारासाठी केलेला हा विक्रम अतिशय महत्वाचा असून यामार्फत अनेक आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांना भारतात गिर्यारोहणसाठी येण्यासाठी प्रेरणा मिळेल. 360 एक्‍सप्लोरर मार्फत अशीच कामगिरी करत राहण्याचा निर्धार आहे. 
- आनंद बनसोडे, एव्हरेस्टवीर, सोलापूर  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everest hero Anand Bansode's record is recorded in the Guinness Book