राज्य सरकारकडून अपेक्षा संपल्या : असे कोण म्हणाले वाचा

 राज्य सरकारकडून अपेक्षा संपल्या : असे कोण म्हणाले वाचा

सांगोला (सोलापूर) : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. यामुळे या निष्क्रिय सरकारकडून आमच्या अपेक्षा रहिल्या नाहीत. उन्हाळ्यात नीरा उजवा कॅनॉलला पाणी सोडले. टेंभूच्या कामासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी दिला असल्याने वेळेत कामे पूर्ण झाली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्‍याला टेंभूचे पाणी मिळाल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले. 


खासदारांची सांगोला तालुक्‍याला भेट 
सांगोला तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर मंगळवारी सांगोल्यात आले होते. त्या वेळी खासदार निंबाळकर बोलत होते. या वेळी खासदार निंबाळकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लहान-मोठे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जपुरवठा न करणाऱ्या बॅंकांवर कारवाई केली जाईल. 

रुग्णांचे आकडे सरकारने लपवले 
शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा सांगोला तालुका आहे. संकटात रुतलेली चाके बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या काळात खासदार म्हणून मी प्रयत्न करणार आहे. राज्य शासनाने मदत म्हणून 20 रुपये सुद्धा दिले नाहीत. कोरोना रुग्णांचे आकडे सरकारने लपवले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फक्त 12 दिवसांत नीरा उजवा कॅनॉलचे हक्काचे पाणी परत आणले. सांगोला तालुक्‍याला पाणी मिळवून देण्यासाठी मी खंबीर आहे. आमचे पाणी पळवणाऱ्याचे पाणी कसे पळवायचे यासाठी मी लढा देणार असल्याचे सांगत खासदार निंबाळकर यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले. 

कामांच्या अहवाल वाटपाचा प्रारंभ 
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध कामांच्या अहवाल वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, अमरसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार शिंदे, नितीन कर्णे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक आनंदा माने, गजानन भाकरे, श्रीकांत देशमुख, शशिकांत देशमुख, अभिजित नलवडे, अनिल केदार, शिवाजी घेरडे, संभाजी आलदर, साहेबराव पाटील, जयंत केदार, विजय बाबर, पुण्यवंत खटकाळे, बाळासाहेब सावंत, संजय पाटणे, सूर्याजी खटकाळे आदी उपस्थित होते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com