रेखाचित्रातून व्यक्त केली डॉक्‍टर, पोलिसांविषयी कृतज्ञता 

expressed his gratitude about the doctor and police From the drawing
expressed his gratitude about the doctor and police From the drawing
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोना संकटाच्या विरोधात डॉक्‍टर, पोलिस आणि सफाई कामगार जीवाची बाजी लावून नागरिकांसाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील कलाशिक्षक जगदीश डांगे आणि शंकर आंबले यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर ऑइल पेंटच्या माध्यमातून अत्यंत आकर्षक चित्र रेखाटले आहे. तुम्ही घ्या खबरदारी, आम्ही घेतो जबाबदारी.... अशा स्लोगनसह डॉक्‍टर, पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांची प्रातिनिधिक चित्रे रंगविण्यात आली आहेत. 

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, डॉक्‍टर, पोलिस, सफाई कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, विविध शासकीय कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील लोकमान्य विद्यालयातील कलाशिक्षक जगदीश डांगे तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष (कै.) रामभाऊ आंबले यांचे पुत्र शंकर आंबले (टेलर) यांनी पाच दिवस अहोरात्र परिश्रम करून अतिशय आकर्षकरित्या प्रबोधनात्मक चित्र रेखाटले आहे. श्री. डांगे आणि श्री. आंबले यांचा सातत्याने विविध सामाजिक कामात सहभाग असतो. एरवी टेलरिंग करणाऱ्या शंकर आंबले यांनी त्यांचे बंधू संजय यांच्या मदतीने सुमारे 500 मास्क तयार करून विविध लोकांना ते वाटले आहेत. 
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत रस्त्यावर ऑइल पेंटने चित्र रेखाटण्यासाठी आवश्‍यक असलेला ऑइल पेंट भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी उपलब्ध करून दिला आहे. श्री. डांगे व श्री. आंबले यांना संतोष कवडे, मतिमंद विद्यालयातील अजित माने, नवजीवन अपंग शाळेचे मुख्याध्यापक मोहन थोरात, रोटरी क्‍लबचे माजी अध्यक्ष महेश निर्मळे, मनोज चोबे, अमित थिटे, मंगेश थिटे यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com