बांधावरच्या शेतीशाळांना पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ 

shetishala.jpg
shetishala.jpg
Updated on

मोहोळ(सोलापूर)ः शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताहात बांधावर शेतीशाळा या उपक्रमाचा मोहोळ तालुक्‍यातील सुमारे चौदाशे शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. हा उपक्रम पुढील सहा महिने सुरूच राहणार आहे. त्यांना त्या माध्यमातून विविध पिकांच्या लागवडी बाबत प्रबोधन करण्यात येत आहे. 

एक ते सात जुलै या कालावधीत मोहोळ तालुक्‍यातील मोहोळ, कुरूल, नरखेड व पेनुर या कृषी मंडलातील बावन्न गावात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना विविध पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या मंडळात ज्या पिकांची व फळबागांची ज्यादा लागवड आहे त्या पिकाबाबत व फळबागा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

डाळिंब, द्राक्ष, केळी, सिताफळ,या फळबागा सह ऊस, टोमॅटो, काकडी या पिकांच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ऊस लागवडी अगोदर बेणे प्रक्रिया, जमिनीची मशागत, सुधारित वाणांचा वापर, ठिबक सिंचन योजना, शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना या बाबत माहिती देण्यात आली. तालुक्‍यात जे शेतकरी प्रयोगशील आहेत त्यांनाही इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शना साठी आमंत्रित करण्यात आले होते. 31 जुलै पर्यंत पिक विमा भरण्याची मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा असे आवाहन करण्यात आले.  

रबी हंगामात होणार मार्गदर्शन 
बांधावरील शेती शाळा या पुढील सहा महिन्यात चालवल्या जाणार आहे. कोरोना संकटामूळे रबी हंगामात शेतकऱ्यांना लागणारे रबी पीक लागवडीच्या साठी हा उपक्रम उपलब्ध असणार आहे. 
- अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com