esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

crime

त्रासाला कंटाळले होते कुटूंब 
मयत शैलेश घोडके हा काहीच काम करीत नव्हता. वडिलांच्या नावे असलेली जमीन नावावर करण्यावरुन सारखे त्रास देत होता. त्यामुळे सुरेशच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या ओळखीचे असलेले शंकर वडजे, राहुल राठोड यांना मुलाच्या खुनाची सुपारी दिली होती. मयत हा काही कामधंदा करत नव्हता, तो घरातील लोकांना वारंवार त्रास देत होता, वडीलांना जमीन नावावर करून दे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून मयताचे वडील सरेश घोडके यांनी मुलगा सुरेशला ठार मारण्याची सुपारी दिल्याचे संशयीत आरोपी वडजे याने सांगितले. वडजे हा घोडके याच्या शेतालगत राहतो. 

वडिलानेच दिली मुलाच्या खूनाची सुपारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कामधंदा न करता जमीन नावावर करा म्हणून त्रास देणाऱ्या मुलाचा काटा त्याच्या वडीलांनीच काढला, अशी घटना मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली आहे. या प्रकरणात वळसंग पोलिसांनी मयताच्या वडीलासह चारजणांना ताब्यात घेतले आहे. 

हेही नक्‍की वाचा : कारखानदारांना आगामी गाळप हंगामाची आतापासूनच चिंता 


कुंभारी शिवारातील सोलापूर ते अक्कलकोट रस्त्यावरील जमादार वस्तीसमोर एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह पोलिसांना सापडला. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद झाली. पोलिसांना सोशल मिडियाच्या माध्यमातून मयताचा ठावठिकाणा लागला. शैलेश सुरेश घोडके (वय- 28) हा मार्डी येथील असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, दोरीने आवळून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदनात समोर आले. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी वडिलांनीच मुलाचा खून केल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष मानगावे, पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, पोलिस हवालदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, राजेश गायकवाड, मनोहर माने, सुभाष शेंडगे, आसिफ शेख, केशव पवार, शहानाज शेख, विकी माने आदींनी ही कामगिरी केली. 

हेही नक्‍की वाचा : शाळा अनुदानाचा विषय मे महिन्यापर्यंत संपणार 


तिघांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी 
शैलेश घोडके खून प्रकरणात संजय उर्फ भोजु राठोड (रा. मुळेगाव गल्ली, आशानगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (रा. सेवालालनगर, मुळेगाव तांडा), सुरेश सिध्दलिंग घोडके (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांना अक्कलकोट न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. 


हेही नक्‍की वाचा : राज्यातील साडेनऊ हजार शिक्षकांना दिलासा 

go to top