सोलापूर जिल्ह्यात या वर्षी पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज  

crop loan.jpg
crop loan.jpg

सोलापूरः पावसाने जोरदार सूरुवात केल्यानंतर जिल्हाभरातील सर्वच बॅंकाकडून जिल्ह्यात फक्त पन्नास हजार शेतकऱ्यांना 757 कोटी रुपयांचे पीक कर्ज मिळाले आहे. कोरोना संकटाचा अडथळा पार करत बॅंकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांनी 19 हजार 041 शेतकऱ्यांना पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. कर्ज वाटपाची ही रक्कम 345 कोटी 74 लाख वितरीत केली आहे. बॅंक ऑफ ईंडीयाने 7 हजार 927 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. बॅंक ऑफ इंडीयाचा कर्ज वाटपाचा आकडा सर्वात मोठा आहे. आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज देणाऱ्या बॅंकामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडीया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडीया व बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांचा समावेश आहे. सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांच्या जिल्ह्यात 233 शाखा आहेत. एकूण पीक कर्ज वाटपाच्या दिलेल्या उद्दीष्टापैकी या बॅंकांनी आतापर्यत एकूण 32. 63 टक्के कर्ज वाटप केले. अजुनही कर्जवाटप काही काळ सूरूच राहणार आहे. 
खासगी बॅंकांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटपामध्ये दिलेले उद्दीष्टाच्या तुलनेत 124 टक्के कर्ज वाटप केले आहे. या बॅंकांनी 182 कोटी रुपयाचे उद्दीष्ट असताना चक्क 224 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे या खासगी बॅंकांच्या केवळ 59 शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. कर्ज वाटप रकमेचे उद्दीष्ट ओलांडणाऱ्या या बॅंकामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय व इंड़सलॅंड बॅंकाचा समावेश आहे. 

सर्वाधीक शेती पतपुरवठा करणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने देखील दिलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत 99 टक्के वाटप पूर्ण केले आहे. या बॅंकेने 153 कोटी 3 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बॅंकाची एकत्रीत कामगीरी पाहिली तर आतापर्यंत एकूण 50 हजार शेतकऱ्यांना 757 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा झाला आहे. हा पतपुरवठा दिलेल्या ठरवलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत 52 टक्के एवढा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बॅंकाची ही कामगीरी सरस आहे. कोरोनाच्या अडथळ्यातून सावरत या बॅंकांनी ही कामगीरी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com