कोरोना ड्यूटी नाकारणाऱ्या शिक्षकांना दंड ! 'या' 44 शिक्षकांच्या वेतनातून दंडाची वसुली

1teacher_27.jpg
1teacher_27.jpg

सोलापूर : कोरोनाची ड्यूटी हे राष्ट्रीय कामकाज असतानाही गैरहजर राहिलेल्या शिक्षकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील 44 शिक्षकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ही रक्‍कम त्यांच्या ऑक्‍टोबरमधील वेतनातून कपात केली जाणार आहे.


शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, को-मॉर्बिड तथा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह अन्य रुग्ण कोरोनाचा बळी ठरु नयेत म्हणून घरोघरी सर्व्हे केला जात आहेत. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी शहरातील सर्व्हेसाठी महापालिका हद्दीतील शिक्षकांना किमान 30 दिवसांची ड्यूटी दिली आहे. मात्र, राष्ट्रीय कामकाजावर बहिष्कार टाकून काही शिक्षकांनी आयुक्‍तांचा आदेश पाळला नाही. त्यामुळे अशा शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तत्पूर्वी, नागरी आरोग्य केंद्रांकडून त्यांची माहिती मागविण्यात आली आहे. आता ड्यूटी नाकारणाऱ्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत त्याची नोंद केली जाणार आहे. तर गोपनिय अहवालातही या प्रकाराची नोंद घ्यावी, असे आयुक्‍त शिवशंकर यांनी निर्देश दिले आहेत.


वेतनातून दंडाची केली जाणार वसुली
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली आहे. या संकटातून मुक्‍त होण्याच्या हेतूने शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून को- मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हे, माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याची कामे दिली आहेत. तरीही बहूतांश शिक्षकांनी आयुक्‍तांच्या आदेशाला बगल देत ड्यूटी केलेली नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका


शिक्षक आमदारांना धडा शिकवू
'शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण सुरु' या उपक्रमाअंतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन तथा सोशल मिडियाच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास देणे, त्याचे मूल्यमापन करणे, शाळेतील दैनंदिन कामे करणे, चाचणी तयार करणे अशी विविध प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. दुसरीकडे शालेय पोषण आहार बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांदूळ दिला जात आहे. पोत्यातील तांदूळ पिशवीत भरण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना कोरोना ड्यूटीतून मुक्‍त करावे, अशी मागणी वारंवार करुनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिक्षक आमदारकीच्या उमेदवाराला धडा शिकवू, असा इशारा सोलापुरातील शिक्षक तथा शिक्षक संघटनांनी दिला आहे.


दंडात्मक कारवाई झालेले शिक्षक
महालिंग महाजन (पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूल), अविनाश द्यावनपल्ली (मोरेश्‍वर मराठी विद्यालय), खालीद तालिकोट (नु. कस्तुरबा उर्दू विद्यालय), रितेश मेहता, बसवंत पाटील (एनएफएस कोठारी हायस्कूल), विशाल पवार (लोकसेवा हायस्कूल), सुरज पवार, अमोर घनाते, युसूफ शेख, आनंद ढगे (निर्मलाताई ठोकळ प्रशाला), श्रीकांत भोसले (ज्ञानसागर प्रशाला), रामदास हुल्ले (श्री बसवेश्‍वर मराठी विद्यालय, विडी घरकूल), दादा गावडे, यशवंत देशमुख, सचिन केसरकर (नारायणराव कुचन प्राथमिक शाळा), मनोज टंगसाळ (निलकंठेश्‍वर प्रशाला), सुदर्शन व्हराडे (लाल बहादूर शास्त्री शाळा), दयानंद लोंढे, राजेंद्रकुमार नारळे (पंचशिल माध्यमिक प्रशाला), शांताराम सळगुंडे, सचिन जाधव (हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगे), दिपक कान्हा (विद्यानिकेतन हायस्कूल भाग. 25), इरण्णा गोब्बूर (विमल अ. कान्हा प्रशाला), मार्तंडराव डांगे (छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा), सचिन डोईफोडे, विश्‍वासराव घंटेनारारु (राजश्री शाहू मराठी विद्यालय), संतोष भद्राशेट्टी, शरद पवार (भारत विद्यालय), विरुपाक्ष आवरसंग (सुर्यकांत बोगार कन्नड विद्यालय), देवदत्त मेटकरी (लक्ष्मीबाई तिपण्णा दासरी प्रशाला), अमोल मुडके (श्री सुलाखे विद्यालय), राजेश साखरे (रामलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्रशाला), गणेश मोटे, नागनाथ आगजे (अमर मराठी विद्यालय), अंबण्णा कांबळे (अरुण प्राथमिक शाळा), किरण माने (श्री गजानन विद्यालय, तुळजापूर रोड), रमेश बगळे (संभाजी शिंदे प्रायमरी स्कूल), बाळू गंभीर (कुचन हायस्कूल), अकबर पठाण, मोहम्मदीस पेरमलपल्ली, खललीउद पेरमपल्ली (पानगल हायस्कूल), अविनाश मठपती (मॉडर्न हायस्कूल), अल्लाउद्दीन शेख (एसएसए उर्दू हायस्कूल), रत्नाकर होटगी (ज्ञानप्रबोधिनी).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com