बार्शीतील गर्दी व बेशिस्तीला आताच पायबंद घाला असे कोण म्हणाले? ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

सद्यःस्थितीत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विचार केला असता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढीचा मुख्य स्रोत असणारे रुग्णालय, उपचार करणारी सेंटर येथील दुरवस्था व व्यवस्था या संदर्भाने तात्काळ कडक कार्यवाही करणे गरजेचे वाटते. 

बार्शी(सोलापूर): बार्शी शहर व तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विनाविलंब तात्काळ प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदन बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना दिले आहे. 

हेही वाचाः कोरोना रोखण्यासाठी कुंभारी विडी घरकूल, साई नगराचे प्रयत्न ठरू लागले महत्वाचे 

सद्यःस्थितीत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विचार केला असता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढीचा मुख्य स्रोत असणारे रुग्णालय, उपचार करणारी सेंटर येथील दुरवस्था व व्यवस्था या संदर्भाने तात्काळ कडक कार्यवाही करणे गरजेचे वाटते. 

हेही वाचाः संचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बॅंकच सात दिवसासाठी बंद 

कोरोना साखळी तोडण्यासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना संदर्भात धाडसी निर्णय घेण्याची मागणी अक्कलकोटे यांनी निवेदनात केली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा मुख्य स्रोत असणाऱ्या ठिकाणी असणारी दुरवस्था, हलगर्जीपणा याअनुषंगाने योग्य ती कारवाई आणि कार्यवाही करणे, विलगीकरण केलेल्याची स्वतःची घरची चांगली व्यवस्था असेल तर त्याच्याच घरी विलगीकरण करणे, संस्थात्मक विलगीकरण असलेल्या ठिकाणी तात्पुरती स्वतंत्र शौचालये उभारावी. शौचालय दिवसातून किमान 4 वेळेस निर्जंतुकीकरण करावे. गर्दी टाळण्यासाठी एक दुचाकी एक प्रवासी, एक चारचाकी किमान दोन प्रवासी हा नियम करावा.  रिक्षाचालकांना सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असावा. 

पहाटेचा भाजीपाला लिलाव आणि होणारी गर्दी यावर पायबंद घालण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या बाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यासह स्थानिक अधिकाऱ्यांना व पोलिसांना दिले आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who demdanded to controll crowd and undicipline otherwise corona may spread