सांगोल्यात रेशनकार्ड नसलेल्या पाच हजार नागरिकांना धान्यवाटप सुरू

dhanyvatsp.jpg
dhanyvatsp.jpg

सांगोला(सोलापूर): रेशनकार्ड नसणाऱ्या तालुक्‍यातील 15 हजार 84 कुटुंबातील 5975 नागरिकांना मोफत धान्य वाटप योजनेची सुरुवात सांगोल्याचे तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या हस्ते करण्यात आली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना जाहीर केली. तसेच कोणत्याही राज्य शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्‍यातील 103 गावामध्ये व सांगोला शहरामध्ये तलाठी व शहारामध्ये नगरपरिषद सांगोला यांच्या मार्फत सर्व्हे करणेत आला. यामधील विना शिधापत्रिका धारकांना तालुक्‍यातील 1584 कुटुंबातील 5975 नागरिकांचा समावेश आहे. या कुटुंबांना मे व जून महिन्याकरिता प्रतिमहीना 5 किलो या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीस 10 किलो याप्रमाणे वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांचे कडून तांदूळ व हरभरा शासकीय धान्य गोदाम येथे प्राप्त झालेले आहे. 
सदर धान्याचे वाटप करणेसाठी सांगोला तालुक्‍यात जवळपासच्या गावातील कुटुंबाचे घरांनुसार एकूण 25 वाटप केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. उदनवाडी, जुजारपूर, बुरंगेवाडी, पारे, बुद्दैहाळ, कोळा, तिप्पेहाळळी, कटफळ चिकमहूद, महूद बुद्रुक, नवी लोटेवाडी, य. मंगेवाडी, अजनाळे, नाझरे, मांजरी, बामणी, वाढेगाव, सांगोला शहर, बागलवाडी, खिलारीवाडी, शिवणे, सोनंद, निजामपूर ईत्यादी गावात केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. या लाभार्थींना तांदुळ व हरभरा डाळीचे मोफत वाटप करण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com